शिमला : शिमल्यात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. जिथे नजर जावी तिथे बर्फच बर्फ दिसतो आहे. या जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पर्यटकांनी मात्र, बर्फवृष्टीचा आनंद लुटला आहे. सध्या सगळीकडे थंडीने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत.