#Hindu Trending on Twitter : सध्या सगळीकडे ख्रिसमसचा उत्साह सुरू आहे. भारतातसुद्धा सगळीकडे मोठ्या आनंदात आणि उत्साहात ख्रिसमस साजरा केला जात आहे भारत तर विविधतेने नटलेला देश आहे , प्रत्येक धर्माचे सॅन समारंभ आपल्याकडे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. पण सध्या ख्रिसमस च्या पार्श्वभूमीवर ट्विटर वर एक वेगळाच ट्रेंड जोरात सुरु आहे.   



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ट्वीटरवरील अनेक युजर्सने यासंदर्भात ट्वीट करत #Hindu हा हॅशटॅह वापरला आहे. त्यांच्यानुसार ख्रिस्ती धर्मीय चर्चमध्ये हिंदू सण साजरे करतात का? तर मग हिंदू धर्मीय मंदिरांमध्ये ख्रिसमस का साजरा करतात ? असा प्रश्न विचारात सध्या ट्विटरवर वॉर सुरु आहे. 


उत्तरप्रदेशमधील काशी घाटावर ख्रिसमस आयोजन आणि सेलिब्रेशन केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे त्या व्हिडिओची बरीच चर्चा होतेय



इतकंच काय तर रामकृष्ण माठातील असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय,



यात येशू ख्रिस्ताच्या फोटोची पूजा केल्याचं दिसत आहे, या सर्व व्हिडिओंवर सध्या नेटकरी भलतेच चिडलेले दिसत आहेत .  



भारतात सर्व धर्म समभाव वैगैरे आहे पण, इतर धर्मीय हिंदू सणका साजरे करत नाहीत ख्रिश्चन धर्मीय दिवाळी का साजरी करत नाहीत असा सवाल नेटकऱ्यानी उपस्थित केला आहे.