लखनऊ : उत्तर प्रदेशात धक्कादायक घटना घडली. हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लखनऊ नाका भागात कमलेश तिवारी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. कमलेश तिवारी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमलेश तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर लखनऊ येथे दुकानंही बंद करण्यात आली होती. आता कमलेश तिवारी यांची हत्या करण्यात आल्यानंतरही लखनऊमध्ये तणाव वाढला आहे. हत्या झाल्याचे समजतात बाजारपेठ तात्काळ बंद करण्यात आली. 



बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी कमलेश यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. ते या हल्ल्यात गंभीर जखमी झालेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दरम्यान, तिवारी यांचा नोकर अर्धा तास १०० हा नंबर डायल करत होता, मात्र फोन लागला नाही. घटना घडल्यावर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचे तिवारी यांच्या नोकराने सांगितले.