मुंबई :  प्रत्येक सण हा आपला असा वेगळा रंग घेऊन येत असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र रंगपंचमी, होळी हे सण असे असतात जेव्हा खऱ्या अर्थाने रंगाची उधळण होत असते. हा उत्सव हिंदू धर्मातील सर्व व्यक्ती साजरे करत असतात. या सणात अनेक रंग उधळले जातात आणि एकमेकांमधील हेवेदावे दूर केले जातात. आणि सर्व जण एकाच रंगात रंगून जातात.


असं सांगितलं जातं की, हरिण्यकशिपुने स्वतःलाच देव मानत आपल्या मुलाला पुत्र प्रल्हादाला आपल्या बहिणीच्या होलिकेच्या माध्यमातून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र भगवानने आपल्या भक्तांवर कृपा केली आणि त्या चितेमध्ये होलिकेला ठकललं होतं. म्हणून या दिवशी होळी पेटवली जाते. आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण पाहायला मिळते.


होळी पूजेचे महत्व


घरात सुख – शांती, समृद्धि, संतान प्राप्ती यासारख्या अनेक गोष्टींसाठी महिला या दिवशी होळीची पूजा करतात. होळीच्या एक महिना अगोदर सर्व तयारी सुरू असते. अनेक सुकलेल्या झाडांची फांदी जमा केली जाते. आणि होळीच्या दिवशी त्यांना एकत्र करून पूजा करून पेटवले जाते. (या पद्धतीने बनवा रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंग (व्हिडिओ)


होळीचे शुभ मुहूर्त 


1 मार्च 2018
होळीचा शुभ मुहूर्त – 7.39 ते  9 
1 तास 20 मिनिटे हा शुभ मुहूर्त आहे. या वेळेत होळीचे पूजन केले जाऊ शकतात. 


रंगपंचमीचे शुभ मुहूर्त


2 मार्च 2018
रंगपंचमीचा शुभ मुहूर्त १०.२३


1 मार्च 2018 मध्ये रात्री 8 वाजून 57 मिनिटांपासून ते 2 मार्च 2018 पर्यंत सायंकाळी 6 वाजून 21 मिनिटांपर्यंत रंगपंचमी साजरी करता येणार आहे.