Interest rates: `या` बँकेने कर्जाच्या व्याजदरात केली मोठी घट; तुम्हीही ग्राहक आहात का?
Bank of Baroda home loan:तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे.
मुंबई : Bank of Baroda home loan:तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. नवीन व्याजदर नवीन गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना तसेच इतर बँकांकडून घेतलेले कर्ज BOB मध्ये हस्तांतरित करणाऱ्या ग्राहकांना लागू होईल.
तुम्हीही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना एक जबरदस्त भेट दिली आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने गृहकर्जावरील व्याज दर 6.75 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांवर कमी केला आहे. म्हणजेच आता ग्राहकांवरील कर्जाचा बोजा आणखी कमी होणार आहे.
बँकेने दिली माहिती
व्याजातील ही कपात बँकेने मर्यादित कालावधीसाठी केली आहे. बँकेने याबाबत एक माहिती दिली आहे. बँकेने म्हटले आहे की गृहकर्जावरील नवीन व्याज दर 30 जून 2022 पर्यंत लागू असतील आणि कर्जाच्या बाबतीत कर्जदाराच्या CIBIL स्कोअरवर देखील अवलंबून असेल.
गृहकर्जावर 6.50. टक्के व्याज
BoB चे महाव्यवस्थापक एचटी सोलंकी (गृह कर्ज आणि इतर किरकोळ मालमत्ता) म्हणाले, ''गेल्या काही महिन्यांपासून घरांच्या विक्रीत तेजी दिसून येत आहे. ग्राहकांच्या हितासाठी, ए. 6.50 टक्के विशेष व्याजदर मर्यादित कालावधीसाठी ऑफर केला जाणार आहे. यासाठी ग्राहकांना कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.''
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नवे व्याजदर नवीन गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना तसेच इतर बँकांकडून घेतलेले कर्ज BOBकडे हस्तांतरित करणाऱ्यांना लागू होईल. हा बदल सर्व कर्जाच्या रकमेवर आणि फक्त CIBIL स्कोअर 771 किंवा त्याहून अधिक असलेल्या ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.