नवी दिल्‍ली : देशाचे नवे गृहमंत्री अमित शहा आता अॅक्शनमध्ये दिसत आहेत. गृहमंत्री बनताच त्यांनी बैठका सुरु केल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या ४ दिवसात काश्मीरच्या मुद्द्यावर २ वेळा बैठक घेतली आहे. अमित शहा यांचा गृहमंत्री झाल्यानंतर मंगळवारी चौथा दिवस आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शहा यांनी ३१ मे रोजी पदभार सांभाळला. त्यांनी १ जूनला गृह मंत्रालय संबंधित विविध मुद्द्यावर प्रेजेंटेशन घेतलं. ३ जूनला त्यांनी अंतर्गत सुरक्षेवर बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांच्यासह आईबी चीफ आणि रॉ चीफ देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा झाली.


आज अमित शहा यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर आणखी एक महत्त्वाची बैठक घेतली. गृह सचिव, काश्मीरचे अतिरिक्त सचिव आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, य़ा बैठकीत गृहमंत्री यांनी राज्यातील विकास आणि त्यासंबंधित योजनांची माहिती घेतली.