How to get rid of Lizards: घरात उंदीर, पाल आणि झुरळं यांचा आपल्याला अनेकदा त्रास होतो. असं एकही घर नसेल जिथे या लहान प्राण्यांचा (Home Insects) त्रास लोकांना होत नसेल. त्यातून आपल्याला सतत रोगांचाही धोका असतो त्यामुळे आपल्याला आपलं घर हे फार जास्त सुरक्षित आणि स्वच्छ (Clean and Safe Home) ठेवण्याचीही गरज असते. कोविडनंतर लोकांना आपल्या आरोग्याचे आणि स्वच्छेतेचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे आपण या सगळ्या प्राण्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करतो. सध्या आपल्याकडे अशा प्राण्यांचे प्रमाण घरामध्ये वाढताना दिसते आहे. आपल्याल कळतंच नाही की आपण नक्की या प्राण्यांचा नायनाट करण्यासाठी नक्की कोणते प्रयत्न करू शकतो याचा सतत विचार करत असतो. सध्या अशा काही गोष्टीं अवलंबवणे आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचे ठरले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हालाही यापैंकी पालीची समस्या अनेक भेडसावत असेलच. अनेकांना त्यांच्या घरात या पालींचा (Lizards) कसा नायनाट लावायचा असा प्रश्न पडतो. ते अनेक उपाय करून पाहतात परंतु त्यांना समजतंच नाही की नक्की या प्राण्यांचा बंदोबस्त लागतच का नाही. तेव्हा काळजी करू नका सध्या तुम्ही असे काही उपाय करू शकता जेणेकरून तुम्ही या पालींचा घरगुती उपाय वापरून नायनाट कराल. तेव्हा जाणून घेऊया की नक्की तुम्ही कोणकोणत्या घरगुती उपायांचा वापर करू शकता. 


कांदा लसूण ठेवा - 


अनेकांना पालीची भितीही असत. काही महिलांना तर पालीची इतकी भिती वाटते की त्या त्यांना पाहून जोरात किंचाळतातही. त्यांच्या मनात अशा प्राण्यांची भितीही असते. त्यातून कितीही प्रयत्न केले तरी पाली काही घरातून जात नाहीत. तेव्हा करायचं काय कसा प्रश्न अनेकांना पडतो. तेव्हा फक्त एकच काम करा आणि ते म्हणजे घरात कांदा आणि लसूण ठेवा. कांदा आणि लसूण (Onion and Ginger) ठेवण्यानं सरडा किंवा पाली सारखे प्राणी तुमच्या घरात येणार नाहीत. अशावेळी तुम्ही एक काम करू शकता आणि ते म्हणजे पंखा घरात जोरात लावा म्हणजे त्याचा वास संपुर्ण घरात पसरेल आणि त्याच्या वासानं संपुर्ण घरातील सरडा आणि पाली यांचा त्रास कमी होऊ शकतो. 


अंड्याचे कवच ठेवा - 


कांदा, लसूणासोबतच तुम्ही अंड्याचे कवचही (Egg) ठेवू शकता. त्यानं तुमच्या घरातील पाली दूर पळू शकतील. असं म्हणतात की, अंड्याच्या बाहेरील कव्हरच्या बाजूनं पाली दूर पळतात. यासोबत तुम्ही मिरचीचा स्प्रेही तयार करू शकता. काळी मिरीची पूडही तुम्ही यात टाकू शकतात आणि ज्या भागात तुम्हाला सरडा आणि पालीचा त्रास असेल तिथे तुम्ही हे फवारे मारेलत तर तुम्हाला पालींपासून सुटका मिळू शकेल. तुम्ही घरचा एसीही अशावेळी वाढवू शकता कारण पालींना थंड जागी फारसं फिरायला आवडतं नाही तर त्यांना गरम जागेत फिरायला आवडतं.