मुंबई : आपण दररोज आपले कपडे धुत असतो. साफ आणि स्वच्छ कपडे घातल्याने आपलं मन देखील आनंदी राहातं. तसेच आपल्या सगळ्यांना हे तर माहित आहे की, कपडे धुण्यासाठी डिटर्जंट पावडर आणि साबणाचा वापर केला जातो. कपडे धुतल्यानंतर आपल्यापैकी अनेक लोक उरलेले डिटर्जंट द्रावण फेकून देतात. परंतु तुम्हाला माहितीय का की, तुम्ही त्याला वाया न घालवता, त्याचा वापर पुन्हा करु शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर, कपडे चमकण्यासाठी आणि बॅक्टेरिया मुक्त ठेवण्यासाठी लोक सर्वोत्तम डिटर्जंट वापरतात. दुसरीकडे, कपडे अधिक आपण डिटर्जंटमध्ये भिजत ठेवतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, कपडे धुतल्यानंतर उरलेले डिटर्जंट द्रावण देखील अनेक प्रकारे वापरता येते आणि पूर्ण पैसे वसूल केले जाऊ शकतात. चला तर मग उरलेले डिटर्जंट कसे वापरायचे ते जाणून घेऊया.


कपडे धुतल्यानंतर उरलेले डिटर्जंट द्रावण फेकून देण्याऐवजी तुम्ही त्याद्वारे घराची फर्शी पुसू शकता. त्याला तुम्ही ब्रशने घासल्यानंतर किंवा फक्त कपड्याने पुसल्यानंतर मजला चमकू लागेल.


घरातील स्वयंपाकघर आणि बाथरूममधील वॉश बेसिन साफ करणे हे खूप कठीण काम आहे. त्यातील साबण आणि अन्नाचे डाग सहजासहजी सुटत नाहीत. अशा स्थितीत डिटर्जंट सोल्युशनने तुम्ही घरातील सर्व वॉश बेसिन स्वच्छ करू शकता. यासाठी डिटर्जंट सोल्युशनमध्ये व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा मिसळा. आता हे द्रावण वॉश बेसिनवर टाकून बेसिनला ब्रशने घासून घ्या. यानंतर बेसिन स्वच्छ पाण्याने धुवा. तुम्हाला दिसेल की तुमचे बेसिन अगदी नवीनसारखे चमकेल.


स्वयंपाकघरातील टॉवेल साफ करणे
स्वयंपाकघरात वापरलेले कपडे किंवा टॉवेल सामान्य कपड्यांसह धुण्याची चूक कधीही करू नका. अशा परिस्थितीत टॉवेलवरील तेल आणि अन्नाचे डागही काढले जात नाहीत. तसेच, टॉवेलचे डाग तुमचे बाकीचे कपडे खराब करू शकतात.


किचन टॉवेल धुण्यासाठी, उरलेल्या डिटर्जंट सोल्युशनमध्ये अर्धा लिटर पाणी आणि 1 चमचे बेकिंग सोडा घाला आणि गरम करा. आता या पाण्यात टॉवेल भिजवा आणि पाणी थंड झाल्यावर टॉवेल बाहेर काढून धुवा. याने तुमचा किचन टॉवेल लगेच साफ होईल.