Honda Cars recalls: जपानी कार कंपनी होंडा कार्सने भारतातील 77 हजार 951 युनिट कार बाजारातून परत मागे घेण्याची घोषणा केली आहे. हा रिकॉल ठराविक मॉडेलसाठीच आहे. सदोष फ्युअल पंपामुळे कंपनीने ह्या कार मागे घेण्याचे ठरवले आहे. कंपनी मोफत सर्व फ्युअल पंपांना ठिक करेल. या पंपाला वेळी बदलले गेले नाही तर काही भविष्यात इंजिन बंद पडण्याच्या किंवा कार स्टार्ट न होण्याच्या अडचणी उत्पन्न होऊ शकतात.


देशभरात 17 एप्रिलपासून सुरू होणार दुरूस्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्राहकांच्या कार डीलर दुरूस्त करून देणार आहेत. ग्राहकांना वयक्तिकरित्या कंपनी संपर्क करणार आहे. जानेवारी - ऑगस्ट 2019 मध्ये तयार केलेले कारचे मॉडेलमध्ये दोष आढळून आला आहे तसेच जानेवारी 2019 ते सप्टेंबर 2020 मध्ये तायर झालेल्या कारमध्येही हा दोष आढळून आला आहे.


कोणत्या कारच्या मॉडेलमध्ये दोष


अमेज Amaze


 होंडा सिटी चौथी जनरेशन Honda City's Fourth Generation
 डब्ल्यूआर-वी,  WR-V
 जैज, Jazz
 सिविक,  Civic
 बीआर-वी, BR-V
 सीआरवी CRV
 
 वर नमुद केलेल्या तारखेदरम्यान या कार बनवल्या गेल्या असतील. तर या सर्व कारची कंपनी मोफत दुरूस्ती करणार आहे. कंपनीने ग्राहकांना आवाहन केले आहे की,  कोरोना काळात डीलरशिपमध्ये कमी कर्मचारी काम करीत असावेत. तर आपण तारीख आणि वेळेचे नियोजन करून आपली कार दुरूस्त करून घ्यावी.