चंदीगड : बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या डेरा प्रमुख बाबा राम रहीमवर (Gurmeet Ram Rahim Singh) गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राम रहीम याला रविवारी येथे दाखल करण्यात आले आहे. त्याआधी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे रोहतकच्या सुनारिया कारागृहातून पीजीआयएमएसमध्येही दाखल करण्यात आले होते.


हनीप्रीत अटेंडंट झाली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बाबा राम रहीमची मैत्रिण आणि जवळची सहकारी हनीप्रीत  (Honeypreet) आता रुग्णालयात त्याची काळजी घेईल. हनीप्रीतने स्वत: राम रहीम ज्या रूग्णालयात दाखल केले आहे. तिथे तिने अटेंडंट म्हणून नोंदणी केली आहे. पुढच्या एका आठवड्यात ती बाबा राम रहीमची काळजी घेईल. तिला रुग्णालयात राम रहीमला भेटायला दिले जाईल आणि ती राम रहीमच्या सेवेसाठी रूग्णालयात हजर राहिल. हनीप्रीतने तिचे अटेंडंट कार्डही हॉस्पिटलमध्ये तयार करुन घेतले आहे.


राम रहीम हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील सुनरिया जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. तुरुंगात असताना आपल्या पोटात दुखत असल्याची तक्रार त्याने केली. त्यानंतर गुरुवारी रोहतक येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (पीजीआयएमएस) त्याच्यावर काही चाचण्या करण्यात आल्या. यानंतर राम रहीमला पुढील चाचण्यांसाठी मेदांता रुग्णालयात नेण्यात आले.


रोहतक येथून गुरुग्राम येथे शिफ्ट केले


बाबा राम रहीमच्या प्रकृतीशी संबंधित सर्व चाचण्या पीजीआयएमएसमध्ये करता आल्या नाहीत, असे सुनारिया जेलचे अधीक्षक सुनील सांगवान यांनी सांगितले. यासंदर्भात आणखी एका उच्च सरकारी रुग्णालयात संपर्क साधला गेला आणि ते म्हणाले की कोविड -19च्या परिस्थितीमुळे सध्या तेथे चाचण्या घेतल्या जात नाहीत.


सांगवान म्हणाले की, नंतर तुरूंगातील अधिकाऱ्यांना मेदांता रुग्णालयात तपासणी करता येईल, असे सुचविले होते. त्यानंतर भारी पोलीस दलाच्या दरम्यान राम रहीमला रुग्णालयात नेण्यात आले. यापूर्वी अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, राम रहीमच्या पोटाचे सीटी स्कॅन आणि इतर चाचण्या रोहतकमध्ये असलेल्या पीजीआयएमएसमध्ये केल्या आहेत.


डेरा प्रमुख बाबा राम रहीम दोन महिला अनुयायांवर बलात्कार प्रकणी दोषी आहे. त्यानंतर तो 2017 पासून सुनारिया तुरूंगात आहे. ऑगस्ट 2017 मध्ये पंचकुला येथील सीबीआयच्या विशेष कोर्टाने त्यांना बलात्काराच्या दोन प्रकरणात 20 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.