मुंबई : रविवारी म्हणजे 1 मे रोजी स्पाइसजेट विमानासोबत एक धक्कादायक अपघात घडला, ज्यामुळे 11 प्रवासी जखमी झाले आहे. या भीतीदायक अनुभवाने त्यांच्या मनात हवाई प्रवासाची भीती निर्माण झाली आहे. खरंतर स्पाइसजेटच्या एसजी-९४५ फ्लाइटमधील काही प्रवासी मुंबईहून बंगालमधील दुर्गापूरला जात होते. प्रत्येकजण इच्छित स्थळी पोहोचणार असताना अचानक आलेल्या वादळाने सर्व काही बदलून टाकले. लँडिंगच्या काही वेळापूर्वी विमान एअर टर्ब्युलन्सला बळी ठरले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आता याप्रकरणी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.


पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे रविवारी विमान अपघात झाला, त्यात 11 जण जखमी झाले. विमानातील प्रवासी आता ज्या प्रकारे त्या भीषण परिस्थितीचे वर्णन करत आहेत, त्यावरून ही खूप मोठी दुर्घटना होता होता वाचली असल्याचे लक्षात येत आहे.


दुसरीकडे, स्पाईसजेटचे अधिकृत विधान आणि प्रवाशांचे म्हणणे यात तफावत आहे.


स्पाईसजेटने सांगितले होते की, रविवारी रात्री स्पाइसजेटचे फ्लाइट SG-945 मुंबईहून दुर्गापूरला जात होते. तेव्हा लँडिंग दरम्यान विमानाला हादरे बसले आणि अनेक प्रवासी जखमी झाले.


हे विमान बैसाखी वादळात अडकल्याचे सांगण्यात येत आहे. खरंतर हे वादळ बंगालला उष्णतेपासून दिलासा देणारे मानले जाते. परंतु या वादळात विमान अडकल्याने ते लोकांच्या बेतलं.


लोकांनी वर्णन केल्यानुतास विमानातील हादरे इतके भयंकर होते की, सामानाचा रॅकच तुटून प्रवाशांच्या अंगावर पडला. सामान पडल्यामुळे प्रवाशांना दुखापत झाली. एका प्रवाशाच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाल्याचेही डॉक्टर तपन यांनी सांगितले.


मोहम्मद इनामुल अन्सारी या जखमी प्रवाशाने सांगितले की, विमान लँडन करण्यासाठी अर्धा तास असताना. त्याला थोडेसे हादरे जाणवले. त्यानंतर काही वेळाने मोठे हादरे बसले, त्यामुळे त्यांची सीटही तुटली.


दुसऱ्या जखमी प्रवाशानेही सांगितले की, लँडिंगच्या काही वेळापूर्वी त्याला भूकंपाचे धक्के जाणवले. ते म्हणाले की, विमान वर-खाली होत होते. तसेच विमान आता काही वेळात उलटेच होईल असे वाटत होते.


त्याचवेळी जखमी महिला प्रवाशाने सांगितले की, उतरण्यापूर्वी बाहेर जोरदार वीज पडली होती. त्याचवेळी विमानात हादरे बसले. ती महिला म्हणाली, 'मी माझ्या मुलाला विचारले की, इतके हादरे का आहेत? परंतु त्याच्या धक्क्यांमुळे मी पडले आणि मला दुखापत झाली.'