भोपाल : मध्यप्रदेशातील अदिवासी अंचलामध्ये महिला आणि तरुणींवर होणाऱ्या अन्यायाची घटना समोर आली आहे. धार जिल्ह्यात कुटूंबियांनी दोन तरुणींना अतोनात मारहाण केली. आपल्या नातेवाईकांमधीलच असलेल्या मित्राशी फोनवर बोलत असल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच अलीजापूरमध्ये एका तरुणीला झालेली मारझोड समोर आली होती. त्यानंतर धार जिल्ह्यातील पीपलवा गावातील एक व्हिडिओ सोशलमीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


या व्हिडिओमध्ये दिसतंय की, दोन मुलींना उपस्थित कुटूंबियांकडून लाठ्या - काठ्यांनी मारझोड केली जातेय. यामध्ये महिलादेखील सामिल होत्या. एखाद्या प्राण्याला देखील अशी वागणूक मिळत नाही. 


टांडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा व्हिडिओ वायरल झाल्यावर त्वरीत कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी ७ लोकांना अटक केली आहे.