Hostel girls beat up school headmaster: कर्नाटकात (Karnataka News) एक धक्कादायक घटना घडल्याचं पहायला मिळतंय. कर्नाटकातील एका शाळेतील घटनेच्या व्हिडिओमुळे इंटरनेटवर (Social Media Viral Video) खळबळ उडाली आहे. शाळेच्या वसतिगृहात अल्पवयीन मुलीची छेड (molestation of a minor girl) काढल्याप्रकरणी हेडमास्तरला पोरींनी चोप (Girls beat up school headmaster) दिल्याचं दिसून आलं. त्याचा व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालताना दिसतोय. त्यामुळे सर्वत्र या व्हिडीओची चर्चा होताना दिसत आहे. (hostel girls beat up school headmaster in karnataka video goes viral on internet marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकातील श्रीरंगपटना येथील काटेरी सरकारी हायस्कूलमध्ये (Kateri Government High School) ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. जिथं शाळकरी मुलींनी मुख्याध्यापकानं शाळेच्या वसतिगृहात (Hostel Girls) एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय.


आणखी वाचा - 'या' देशात Google वर सर्वात जास्त सर्च होतोय S#*; यादीत भारत कुठंय


पांडवपुरा तालुक्यातील काटेरी गावातील शाळेच्या वसतिगृहातील मुलींनी  (Hostel Girls) सोबती राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप केली. त्यानंतर मुलींनी स्वत: काठ्या आणि चपला हातात घेऊन मुख्याध्यापकाला बेदम मारहाण (school headmaster in karnataka) केली. मुख्याध्यापकाने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोरींनी काही सोडलं नाही.


पाहा Video - 



दरम्यान, छेड काढणाऱ्या हेडमास्तरला साधं सुधं नाही, तर मास्तरला बेक्कार चोपलाय. त्यानंतर त्यांनी पोलिसांनी बोलवून हेडमास्तरला (Headmaster) पोलिसांच्या ताब्यात दिलं. मास्तरने मुलीला एका वर्गात बोलवलं आणि तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिला अश्लील व्हिडीओ देखील दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच कोणाला सांगितलं तर शाळेतून काढून टाकण्याची धमकी देखील दिल्याचा आरोप मुलीने केला आहे.