Hot Springs: सध्या सगळीकडेच थंडीचा माहोल आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी गरम ठिकाणी (Hot water Kund) जावसं वाटतं असेलच. काही ठिकाणी आपण फिरून आलो असू तर आपल्यापैंकी काहीजण कुठेतरी फिरण्यासाठी अजूनही प्लॅनिंग (winter holiday planning 2022) करत असतील. आता आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जेथे गेल्यावर तुम्हाला थंडीत गरमीचा एहसास मिळेल. आपल्या भारत देशात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांना ऐतिहासिक तसेच भौगोलिक महत्त्व आहे. अशा ठिकाणी फिरावंसं आपल्या सर्वांनाच कायमच वाटतं असतं. आपल्या देशात अशा अनेक ठिकाणी आपण फिरू शकतो जेथे एकदा गेल्यावर परत परत जाण्याची इच्छा झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. (Hot Springs in India Visit these 5 holy pools in Winter here hot water comes out 24 hrs viral news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे कुंड भारतात प्रचंड फेमस आहेत. त्याचबरोबर येथे येण्यासाठी तुम्हाला फार कष्टही घ्यावे लागणार नाहीत आणि तुमच्या खिशाला परवडणारी अशी ही ठिकाणं आहेत तेव्हा चला तर मग जाणून घेऊया या पाच कुंडांविषयी कारण जर तुम्ही हिवाळ्यातही कुठेतरी दहा-बारा दिवस फिरण्याचा प्लॅन करत असाल तर या पाच कुंडांना भेट देण्याचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. या कुंडांचे पाणी हिवाळ्यातही तुम्हाला नैसर्गिक उब देते. या कुंडांबद्दल सर्वसामान्य फिरस्त्यांमध्ये अनेक समजुतीही प्रचलित आहेत. येथे दिवसाचे 24 तास गरम पाणी (Hot water 24 hrs places in india) येते आणि हा काही चमत्कार नाही तर यामागे एक विशिष्ट विज्ञान आहे. पृथ्वीवर काही ठिकाणी जिथे जिथे नैसर्गिक कुंड आहेत ज्यातून गरम पाणी हे कायमच येते. त्यामुळे थंडीत अशा ठिकाणी गरम पाण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असतात. 


1. तपोवन : 


येथे 24 तास गरम पाणी येते. उत्तराखंडला आवर्जून भेट देणाऱ्या पर्यंटकांसाठी ही एक खूप चांगली भेट आहे. हे गावंच गरम झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या कुंडातून सतत गरम पाणी येते. तपोवन हे जोशीमठपासून 14 किलोमीटर दूर आहे. हा कुंड खूप पवित्र आहे. उत्तराखंड ट्रीप प्लॅन करत असाल तर तुम्ही तपोवनला नक्कीच भेट देऊ शकता. 


2.  मणिकरण : 


या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व फार आहे. येथेही कायमच गरम पाणी येते. हिमाचल प्रदेशातील हे ठिकाण पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. कडाक्याच्या हिमाचल प्रदेशातील थंडीतही या कुंडाचे पाणी तुम्हाला उबदार गरमी देते. या कुंडाशी अनेक धार्मिक श्रद्धाही आहेत. 


हेही वाचा - Maharashtra Temple Corona : भविकांसाठी मोठी बातमी! सप्तशृंगीसह 'या' मंदिरात मास्क सक्ती


3. अत्री कुंड : 


हा कुंड ओडिशामध्ये आहे. हे कुंडही गरम पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. भुवनेश्वरपासून हे कुंड 40 किलोमीटर अंतरावर आहे. हिवाळ्यातही या कुंडातील पाण्याचे तापमान 55 अंशाच्या आसपास राहते अशी या कुंडाबद्दल माहिती कळते.  


4. खीर गंगा : 


हिमाचल प्रदेशातील खीर गंगा हे ठिकाणंही फार लोकप्रिय आहे. या ठिकाणीही गरम पाण्याचे झरे येतात. येथे बाराही महिने उबदार पाणी येते. येथे लोकं हिवाळ्यात खासकरून गरम पाण्यात आंघोळ करण्यासाठी येतात. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील अखरा बाजार येथे हे ठिकाण आहे.


5. वशिष्ठ कुंड : 


खीर आणि अत्री कुंडाप्रमाणे वशिष्ठ कुंड हे देखील एक आकर्षक ठिकाण आहे. येथेही हिवाळ्यात लोकं गरम पाण्यात आंधोळ करण्यासाठी येतात.