केरळ : आजकाल खवय्यांचा हॉटेलमधून जेवण ऑर्डर करून आपली खव्वयेगिरी पुर्ण करण्याचा कल जास्त आहे.  त्यामुळे आता उठसूठ आता सारेच आपली भूक भागवण्यासाठी जेवण ऑर्डर करतात. स्विगी, झोमॅटो या सांरख्या खवय्यांना सुविधा मिळाल्याने हा कल जास्तच वाढत गेला. मात्र या घटनेत ऑर्डर केलेल्या जेवणाऐवजी भलतंच काही हाती आल्याचे समोर आले आहे. ही घटना केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये घडली आहे. त्यामुळे जेवण ऑर्डर केलेल्या व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिरुवनंतपुरमच्या नेदुमनगड परीसरात राहणाऱ्या एका कुटूंबाने 5 मे ला शालीमार हॉटेलमधून जेवण ऑर्डर केले होते. ज्यावेळेस जेवण घरी आले, कुटूंबियांनी पार्सल उघडताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. जेवणाच्या पार्सलमध्ये सापाची चामडी मिळाली. या प्रकरणी कुटूंबियांनी हॉटेल मालकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर हॉटेलला टाळे ठोकले गेले. तसेच हॉटेल मालकाला जिथपर्यंत हॉटेल संपुर्ण साफसफाई करत नाही तिथपर्यंत हॉटेल न उघडण्याचे आदेश देण्यात आले.  


दरम्यान कुटूंबियांच्या या तक्रारीनंतर अन्न व औषध अधिकारी यांनी हॉटेलची तपासणी केली.  या तपासणीत अधिकाऱ्यांना  हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळली. हॉटेलकडे परवाना होता, मात्र अत्यंत घाणेरड्या परीस्थितीत जेवण बनवले जात होते. जेवण बनवणाऱ्या ठिकाणीच कचरा टाकला जात होता. कुठलीही स्वच्छता काम करताना पाळली गेली नव्हती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी हॉटेल मालकाला कारणे द्या नोटीस बजावली. तसेच जेवणाची चाचणी करण्यासाठी त्यांना चाचणीसाठी लॅबमध्ये नेण्यात आले. आता या चाचणीत जेवण निष्कष्ठ आढळल्यास हॉटेलवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.