Teacher Viral Video :  सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एक महिला शिक्षकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. ऑनलाइन बायोलॉजी क्लासमध्ये एका विद्यार्थ्याने गैरवर्तन करतानाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. या विद्यार्थ्याने शिक्षिकेला एक प्रश्न विचारला त्यानंतर शिक्षिकेने त्याला उत्तर देणं टाळलं नाही. तर तिने ज्या प्रकारे जबरदस्त उत्तर दिलं आहे ते पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. आपण ज्या महिला शिक्षिकेबद्दल बोलत आहोत, ती इन्स्टाग्रामवर असून तिचं नाव रक्षिता सिंह बांगर असं आहे. एमबीबीएस असलेली ही शिक्षिका ऑनलाइन बायोलॉजीची क्लास घेते. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ खुद्द तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिला अनेक वेळा क्लास घेताना आलेले अनुभव ती सोशल मीडियावर शेअर करत असते. असाच एकदा क्लास घेताना तिला विद्यार्थ्याने विचारलं की, 'मुलं कशी जन्माला येतात, एक व्यावहारिक उदाहरण देऊन समजून सांगा.' हे ऐकून रक्षिता हैराण झाली पण तिने या प्रश्नाचं उत्तर देणं टाळल नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


महिला शिक्षिकेने शिकवला धडा!


ऑनलाइन क्लास घेताना कमेंटमध्ये हा प्रश्न आल्यानंतर मला धक्का बसाल. पण मी निराश न होता त्या प्रश्नाला सडेतोड उत्तर देण्याचं ठरवलं. रक्षिता म्हणाली की, तू तुझ्या आईला प्रॅक्टिकलसाठी विचारायला हवं. तर अशा पुरुषांनी कोणाची तरी मुलगी, बहीण किंवा आई यांच्याबद्दल अशा प्रकारची टिप्पणी करण्याआधी दोनदा विचार कराला हवा. ते कसं अयोग्य आहे यावर महिला शिक्षिकेने भर दिला आणि त्या प्रश्न विचारणाऱ्याला धडा शिकवला. त्याशिवाय ती बायोलॉजी शिक्षिका असून ती तरुणी आहे. त्यामुळे तिच्या विद्यार्थ्यांपेक्षा फक्त काही वर्षांनी मोठी आहे. ती लवकरच डॉक्टर बनणार आहे. त्यामुळे माझ्या वर्गात अशा प्रकारचं गैरवर्तन ती सहन करणार नाही, असा इशाराही तिने दिला. 


चांगल्या समाजासाठी मदत करा! 


रक्षिताने तिच्या कॅप्शनमध्ये एक जुना अनुभव देखील सांगितला आहे. ती म्हणाली की, तिला अनेक वेळा अयोग्य टिप्पणींचा सामना करावा लागतो. हा व्हिडीओ शेअर करताना ती म्हणाली की, '' अशाच एकदा अयोग्य टिप्पणीचा तिच्यावर गंभीर परिणाम झाला होता. एक शिक्षिका या नात्याने मला नेहमीच असं वाटतं की केवळ शिकवणेच नाही तर त्यांना एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत करणे ही माझी जबाबदारी आहे.



जेव्हा काही स्पॅमर आपल्या समोर येतात, तेव्हा मी सहसा त्यांना प्रेमाने समजावून सांगते. पण माझ्या गेल्या 4 वर्षांच्या ऑनलाइन अनुभवावर आधारित, मी वैयक्तिकरित्या अशा टिप्पण्यांना नम्रपणे प्रतिसाद सहसा देत नाही.''