सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून दोन गोष्टींची जोरदार चर्चा सुरु आहे. पहिली, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि दुसरी म्हणजे 70 वर्षानंतर भारतात आलेले चित्ते (Cheetahs). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (१७ सप्टेंबर) भारतात चित्ता प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ चित्त्यांना (Cheetahs) मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलं. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.


अशातच या चित्तांशी संबंधित एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी परवीन कासवान (Parveen Kaswan) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. चित्ता (Cheetahs) भारतात परत येत आहे. पाहा कशा प्रकारे शेवटच्या चित्त्यांची शिकार करण्यात आली. त्यांना शिकारीसाठी पाळण्यात आलं. सर्वप्रथम तुम्ही हा 1939 चा व्हिडीओ (व्हायरल व्हिडीओ) जरूर पहा..., असे  कासवान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.



चित्त्यांचा इतिहास


कोरियाचे (Chhattisgarh) महाराजा रामानुज प्रताप सिंग देव यांनी 1947 मध्ये शेवटच्या तीन चित्त्यांची शिकार केली होती. या सर्वांची रात्री शिकार करण्यात आली. या व्हिडिओशिवाय सोशल मीडियावर चित्त्यांचे काही फोटोही जोरदार व्हायरल होत आहेत. 



आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केलेल्या फोटोंनीही सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालता आहे. या फोटोंमध्ये परवीन कासवान यांनी चित्तांशी संबंधित महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. 1921-22 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीदरम्यान चित्त्यांची शिकार झाल्याचे फोटोंद्वारे सांगण्यात आले. 1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते.


शिकारीसाठी जाहिरात


एक प्रजाती एका दिवसात कधीच नामशेष होत नाही.  परदेशातून शिकारीसाठी आमंत्रित करण्यासाठी सरकारतर्फे जाहिरात करण्यात आल्याचे परवीन यांनी म्हटलं आहे. तसेच ब्रिटीशांनी शिकारीसाठी चित्त्यांना पकडले. 



सम्राट अकबर चित्त्यांची शिकार करत असे असेही, परवीन यांनी म्हटलं आहे.