Ashneer Grover On Haldiram's: शार्क टँक-प्रसिद्ध फिनटेक कंपनी BharatPe चे सह-संस्थापक आणि माजी प्रमुख अशनीर ग्रोवर (Ashneer Grover) यांनी हल्दीराम खाद्य व्यवसायाचे कौतुक केले आहे. हल्दीराम देशातील सर्वात मोठा खाद्य व्यवसाय असल्याचे सांगितलं आहे. हल्दीरामचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कमल अग्रवाल यांच्यासोबतचा फोटो शेअर करत ग्रोव्हर यांनी एक अतिशय मजेशीर ट्विट केले आहे. अशनीर यांनी सांगितलं की, "आमच्या डीएनएत मिठाई आहे. आम्ही फक्त खाण्याचा विचार करतो." यासोबतच हल्दीरामचा भारतातील सर्वात मोठा फूड बिझनेस होण्याचे रहस्यही त्यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशनीर ग्रोवरने हल्दीरामचे कार्यकारी संचालक कमल अग्रवाल यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, "आम्ही डीएनएने मिठाई बनवणारे आहोत. झोपताना, उठताना, बसताना फक्त खाण्याचा विचार करतो!! हल्दीरामचे कमल अग्रवाल यांची खाण्याची स्पष्टता आणि उत्कटताच सर्वात मोठा ब्रँड बनवतात."



अशनीर ग्रोवर यांचे मजेशीर ट्वीटची सोशल मीडियावर चर्चा असते. अशनीर ग्रोवर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांनी एक नवीन कंपनी स्थापन केली आहे. थर्ड युनिकॉर्न प्रायव्हेट लिमिटेड असे या नवीन कंपनीचे नाव आहे. टॉफलरच्या माहितीनुसार, अशनीर ग्रोवर आणि त्यांच्या पत्नीने ६ जुलै रोजी या कंपनीची पायाभरणी केली होती.