IT रिटर्न करताना अजिबात करू नका या चुका, नाहीतर....
कर चोरी आणि काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यावर सरकार आणि आयकर विभागाने असंख्य उपाय केले आहेत. या चोरीवर अनेक कारवाई केली आहे. आता केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजे CBDT ने करधारकांना चेतावनी दिली आहे की, कर कमी दाखवून जर त्यामध्ये सूट मिळवण्याच्या हेतूने कमी अधिक कर भरू नका. असं केल्यावर आयकर विभाग तुम्हाला दंड आकारेल. या प्रकरात गुन्हा पाहून दंड की कायदेशीर कारवाई करायची हे ठरवलं जाईल.
मुंबई : कर चोरी आणि काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यावर सरकार आणि आयकर विभागाने असंख्य उपाय केले आहेत. या चोरीवर अनेक कारवाई केली आहे. आता केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजे CBDT ने करधारकांना चेतावनी दिली आहे की, कर कमी दाखवून जर त्यामध्ये सूट मिळवण्याच्या हेतूने कमी अधिक कर भरू नका. असं केल्यावर आयकर विभाग तुम्हाला दंड आकारेल. या प्रकरात गुन्हा पाहून दंड की कायदेशीर कारवाई करायची हे ठरवलं जाईल.
रिटर्नमध्ये अफरातफर ही देखील चोरी
आयकर विभागानुसार, जर कुणी कर्मचारी सीए किंवा कर सवलतदाराकडून चुकीची माहिती घेऊन आयटी रिटर्नमध्ये चुकीची माहिती मिळाली असेल. कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केल्यास स्वचालित सिस्टम आहे. जे आयटीआरच्या प्रोसेसिंगच्या कामात येतं. कोणताही अधिकारी यामध्ये फेरबदल करू शकत नाही.
रिटर्न फाईल उशिरा भरल्यास किंवा न केल्यास मिळणार शिक्षा
इनकम टॅक्स रिटर्न फाईल न केल्यास दंड भरावा लागेल. यासाठी 5000 रुपयांचा दंड आकारला जाईल. तसेच टीडीएस रिटर्न वर्षभरात न भरल्यास तर पेनल्टी 10 हजार ते 1 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. जर कुणी व्यक्तीने पॅन कार्ड, इनकम टॅक्स अकाऊंटमधून लिंक केले नाही तर अपराधीची श्रेणी भरावी लागेल.