काश्मीर : अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मिर खोऱ्यात हळूहळू परिस्थिती सुधारण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण आपला धंदाच बंद होतो की काय, या भीतीने दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांनी नवा कट रचला आहे. काश्मीरची ओळख असणारे सफरचंद बाजारात नेण्यापासून रोखण्याचा फुटीरतावांद्याचा डाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मिरमध्ये शोपियाँ सह अनेक ठिकाणी दहशतवादी स्थानिक सफरचंदाच्या बाग मालकांना धमक्या देत आहेत. सफरचंद बाजारात गेली तर थेट जीवानीशी मारू. सफरचंद खराब झाली तर सर्वसामान्य काश्मिरी सफरचंद बाग मालकांच मोठे नुकसान होणार आहे. 



मात्र याचाच फायदा घेवून फुटीरतावादी लोकांमध्ये असंतोष पसरवत आहेत की, याला सरकार जबाबदार आहे, बदला घ्या... फुटीरवाद्यांचा हा कट किती खतरनाक आहे याची कल्पना यावरून येईल. सफरचंद बाजारात येऊ नयेत यासाठी दहशतवादी हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. काश्मीर खो-यातली ६७ टक्के काश्मिरी जनता म्हणजेच सात लाख कुटुंब सफरचंदाच्या व्यापारावर अवलंबून आहेत.


देशातली एकूण सफरचंद उत्पादनाच्या ७९.३ टक्के हिस्सा जम्मू काश्मीरचा आहे. काश्मीर खोऱ्यातून दरवर्षी ६,५०० कोटी रुपयांचे सफरचंद निर्यात होतात. काँग्रेस मात्र फुटीरवाद्यांच्या या कटावर पडदा टाकतांना दिसतेय. पर्यंटनानंतर काश्मिरमधली दुसरी सर्वात मोठी उलाढाल ही फळांच्या व्यवसायातून होते. रोज इथं हजारो ट्रक फळं बाजारात जातात. मात्र सध्या ही संख्या रोडावली आहे. फळांचे ट्रक बाहेर जाऊ न दिल्यानं फळं सडत आहेत.


सरकारच्या विरोधात असंतोष पसरवण्याचा फुटीरतावाद्यांचा कट आहे. ,सफरचंद उत्पादकांना आर्थिक फटका बसावा आणि काश्मीरचं जनजीवन सुरळीत होऊ नये, असा उद्देश त्यामागं आहे. मात्र तो हाणून पाडण्याचा निर्धार सरकारने केला आहे. काश्मिरचं केसर असो वा काहवा. त्यांचा स्वाद, सफरचंदाचा गोडवा. खुबालीचा रसाळपणा, काश्मीरी शाल असो की कलाकुसरीच्या वस्तू. लडाख मधल्या जैविक कलाकृती असो की हर्बल औषधं या सगळ्याचा प्रचार प्रसार जगभरात होण्याची आवश्यकता आहे.