बँक खात्यात किती नाणी जमा करू शकता? जाणून घ्या काय सांगतो RBI चा नियम
Coin Deposits: बँकेचे व्यवहार डिजिटल माध्यमातून जलदगतीने होत आहेत. पण असं असलं तरी काही नियम माहिती असणं आवश्यक आहे. देशात चलन जारी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतो. सध्या देशात 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी चलनात आहेत.
Coin Deposits In Saving Bank Account: बँकेचे व्यवहार डिजिटल माध्यमातून जलदगतीने होत आहेत. मग पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करणं असो की बाजारातून एखादी वस्तू घेणं असो, सर्व कसं एका क्लिकवर होतं. पण असं असलं तरी काही नियम माहिती असणं आवश्यक आहे. देशात चलन जारी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (Reserve Bank Of India) असतो. सध्या देशात 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी चलनात आहेत. नाणी कायदा 2011 अंतर्गत, 1000 रुपयांपर्यंतची नाणी जारी केली जाऊ शकतात. कधी कधी बँकेत जाण्याचा योग येतो. तेव्हा लाजेखातर आपण बँकेत पैसे जमा करण्यासाठी नोटा (Currency) घेऊन जातो. पण अनेकदा आपल्याकडे नाणी (Coins) देखील असतात. अशावेळी प्रश्न पडतो की, बँक कॅशिअर नाणी घेईल की नाही? दुसरीकडे, तुमच्याकडे नाणी जमा असतील तर बँकेत जमा करण्यापूर्वी आरबीआयचा नियम जाणून घ्या.
बँक खात्यात नाणी जमा करण्यासाठी आरबीआयचा नियम (RBI Rule) आहे. या नियमानुसार बँक खात्यात नाणी जमा करण्यासाठी कोणतीही निश्चित मर्यादा नाही. बँक आपल्या खातेदाराकडून किती नाणी स्वीकारायची, याबाबत स्वतंत्र आहे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या बँक खात्यात कोणत्याही मूल्याची नाणी जमा करू शकता. यासाठी कमाल मर्यादा नाही. तुमच्याकडे लाखो आणि कोट्यवधी रुपयांची नाणी असली तरी तुम्ही ती तुमच्या बँक खात्यात जमा करू शकता. याशिवाय कोणत्याही बँकेने नाणी घेण्यास नकार दिल्यास त्याविरोधात तक्रारही करू शकता.
बातमी वाचा- Pan Card For Minors: लहानग्यांना PAN कार्डची आवश्यकता असते! कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
कोणत्याही बँकेच्या शाखेत नाणी जमा करता येतात
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून वार्षिक आधारावर प्राप्त झालेल्या इंडेंटनुसार, किती नाणी टाकायची हे भारत सरकार ठरवते. याशिवाय विविध मूल्यांच्या नाण्यांची टांकसाळ आणि रचना करणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन पैसे जमा करू शकता.