मुंबई :  नोकरदार वर्गासाठी पीएफ (PF) हा महत्वाचा घटक असतो. नोकरदारांच्या मासिक वेतनातून दरमहा ठराविक रक्कम पीएफ म्हणून कापली जाते. पीएफ खात्यात दरमहा एक ठराविक रक्कम जमा होते. नोकरी सोडल्यानंतर ती रक्कम काढता येते. अनेक नोकरदार गरजेच्या काळात उदाहरणार्थ लग्न, घर बांधण्यासाठी तसेच मेडिकल एमरजन्सीमध्ये पीएफची रक्कम काढतात. दरम्यान पीएफमधील रक्कम काढण्यासाठी अर्ज केल्यानंतर किती दिवसांनी खात्यात रक्कम जमा होते, तसेच त्या रक्कमेवर मिळणारे व्याज कोणत्या आधारे दिलं जातं,  याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत. (How many days after application the PF amount is credited to the bank account)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएफ रक्कमेवर मिळणारे व्याजाचे दर हे दरवर्षी सरकार ठरवते. मात्र पीएफवर मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेचे निकष वेगळे आहेत. त्यानुसार व्याजाची रक्कम मिळते.    


किती दिवसात पीएफची रक्कम मिळते?


अनेक जण निवृत्तीआधी नोकरी दरम्यान पीएफ खात्यातून रक्कम काढतात. या पीएफ रक्कमेसाठी अर्ज केल्यानंतर पीएफधारकाला 20 दिवसात पैसे खात्यात जमा होतात.  दरम्यान कोरोनामुळे अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जर तुम्ही कोरोनाच्या शर्थीनुसार पीएफमधून पैसे काढत असाल तर 3-7 दिवसांमध्ये रक्कम प्राप्त होईल. 



व्याज गणना कशी होते?  


पीएफ खात्यात प्रत्येक महिन्यात ठराविक रक्कम जमा होते. या आधारावर व्याजाची गणना केली जाते. पण ही व्याजाची रक्कम वर्षाअखेरीस खात्यात जमा केली जाते.  EPFO च्या नियमांनुसार,  चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तारखेस पीएफ खात्यात शिल्लक असलेल्या रक्कमेवर 12 महिन्यांच्या व्याजाची रक्कम जमा केली जाते.    


संबंधित बातम्या : 


घरबसल्या करता येणार आधार कार्डातील या 4 दुरुस्त्या


कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कुटूंबियांनी उर्वरित कर्ज भरावे का? जाणून घ्या महत्वाची माहिती