मुकेश अंबानी मिनिटाला किती कमावतात माहितीये का? सामान्य माणूस आयुष्यभरही इतके कमावत नाही
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना मागे टाकलं आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींसह देशातील सर्व उद्योगपतींना मागे टाकलं आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 2.8 अब्ज डॉलर्स (सुमारे 23 हजार कोटी रुपये) वरुन 101.8 अब्ज डॉलर्स (सुमारे 8.46 लाख कोटी रुपये) झाली आहे. जून 2022 नंतर अंबानी प्रथमच 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत.
गौतम अदानींना टाकलं मागे
मुकेश अंबानी यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीचे 42 टक्के भागीदारी आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला गौतम अदानी यांनी संपत्तीत मुकश अंबानी यांना मागे टाकलं होतं आणि सर्वात श्रीमंत उद्योगपती ठरले होते. त्यावेळी ब्लूमबर्ग बिलेनियर लिस्टमध्ये 8.12 लाख कोटींच्या संपत्तीसह गौतम अदानी 12 व्या क्रमांकावर होते. तर मुकेश अंबानी 8.07 लाख कोटींच्या संपत्तीसह 13 व्या क्रमांकावर होते.
मुकेश अंबानी एका मिनिटात किती कमावतात?
मुकेश अंबानींची संपत्ती पाहता ते मिनिटाला 1.5 कोटी कमावतात.
दुसऱ्या तिमाहीत रिलायन्सला 17 हजार 394 कोटींचा नफा
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने 27 ऑक्टोबर रोजी आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. जुलै-सप्टेंबर तिमाहीत, कंपनीचा निव्वळ नफा वर्ष-दर-वर्ष (YoY) आधारावर 27% वाढून रु. 17,394 कोटी झाला आहे. एका वर्षापूर्वी Q2FY23 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 13,656 कोटी होता.
Q2 मध्ये कंपनीचा महसूल 2.32 लाख कोटी
चालू आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 1 टक्क्याने वाढून 2.32 लाख कोटी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत तो 2.30 लाख कोटी होता. गेल्या तिमाहीत (एप्रिल-जून) कंपनीचा महसूल 2.07 लाख कोटी रुपये होता.
एलॉन मस्क सर्वात श्रीमंत उद्योगपती
इलेक्ट्रिक वाहननिर्माता कंपनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क 17.60 लाख कोटींच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक ठरले आहेत. त्यांच्यानंतर 14.94 लाख कोटींच्या संपत्तीसह अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस दुसऱ्या तर LVMH चे बर्नार्ड अरनॉल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 13.62 लाख कोटी आहे.