नवी दिल्ली: देशात अत्यंत वेगाने वाढणारी एफएमसीजी (फास्ट मुव्हींग कंज्युमर्स गुड्स) कंपनी पतंजलीला जोरदार धक्का बसला आहे. कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात कंपनाला काही खास असा फायदा झाला नाही. कंपनीला म्हणावा तसा आर्थिक फायदा न होण्याला सरकारने घेतलेल्या जीएसटी आणि नोटबंदीच्या निर्णयामुळे फटका बसल्याचे पतंजलीचे एमडी आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले आहे.


बाबा रामदेव यांनी पतंजलीची मुहूर्तमेढ रोवली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आचार्य बालकृष्ण यांच्या मुलाखतीच्या हवाल्याने लाईवमिंटने दिलेल्या वृत्तानुसार, पतंजलीने गेल्या वर्षातील खाते बंद केले आहे आणि कंपनीचे उत्पन्न सध्या तेवढेच आहे जितके गेल्या वर्षी होते. ४ मे २०१७मध्ये बाबा रामदेव यांनी पतंजलीची मुहूर्तमेढ रोवली होती. तेव्हा रामदेव बाबांनी सांगितले होते की, कंपनीचे उत्पान प्रतिवर्ष दुप्पट होईल. मार्च २०१८ पर्यंत हे उत्पन २० हजार कोटी रूपयांपर्यंत पोहोचेल. सोबतच पतंजली ३१ मार्च २०१९ पर्यंत भारतातील सर्वात मोठी पॅकेज गुड्स कंपनी हिंदुस्तान युनीलिव्हरला मागे टाकेल. रामदेव बाबांनी पतंजलीबाबत ही आश्वाने देत मोठी स्वप्ने जरूर दाखवली. पण, वास्तवात मात्र असे घडताना दिसत नाही.


 नोटबंदीचा पतंजलीला फटका


आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले आहे की, नोटबंदी आणि जीएसटी लागू केल्यावर त्याचा कंपनीला जोरदार फटका बसला आहे. मात्र, पुढील वर्षी पतंजली जोरदार व्यवसाय करेल असा विश्वासही बालकृष्णन यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, येत्या वर्षात आम्ही इन्फ्रास्टक्चर आणि सप्लाय चेन विकसित करण्यासाठी आमची उर्जा खर्च केली. त्यामुले या वर्षात आम्ही उत्पादन वाढवणे किंवा व्यवसायवृद्धीसाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. कारण, व्यवस्था उभारण्यावर आमचा जोर होता.


प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, ३१ मार्च २०१७मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात पतंजलीने १०,५६१ कोटी रूपयांची कमाई केली. पतंजलीचा हा आकडा २०१६ च्या तुलनेत दुप्पट होता, असे सांगितले जाते.