मुंबई : राजस्थानमधील कॉंग्रेसचे संकट संपले आहे. बंडाचे निशाण फडकविणारे सचिन पायलट (Sachin Pilot)यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत  (Ashok Gehlot) यांच्यासोबत काम करण्यास सहमती दर्शविली आहे. हे प्रकरण निकाली काढल्यानंतर सचिन पायलट म्हणाले की, पक्षाच्या हितासाठी मुद्दे उपस्थित करणे आवश्यक होते, पदाची तळमळीने नव्हे तर सन्मानाची लढाई. ३२ दिवसानानंतर पायलट अखेर राजस्थानात घरी परतले आहेत. आता पायलट यांचे जयपूरमध्ये आगमन कधी होणार याची उत्सुकता आहे. राजस्थान कॉंग्रेस सांगत आहे की, सचिन लवकरच आपल्या घरी परत येतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान सुरु असलेल्या सत्ता संघर्षात बंडखोर नेते सचिन पायलट यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेतली. यासंदर्भात आता कॉंग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आलेआहे. कॉंग्रेसचे सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये झालेली बैठक सकारात्मक झाली, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. येत्या १४ तारखेपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनापूर्वी सत्ता संघर्ष मिटण्याची चिन्हे दिसत आहेत. 



सचिन पायलट आणि गहलोत यांच्यातील वाद मिटविण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या बैठका आणि चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरु होती. त्यानंतर सचिन पायलट यांनी मध्यरात्री ट्वीट केले आणि म्हटले की, मी आमच्या तक्रारींकडे लक्ष देऊन त्यांचे निवारण केल्याबद्दल मी सोनिया जी, राहुल जी, प्रियांका गांधी जी आणि कॉंग्रेस नेत्यांचे आभार मानतो. राजस्थानच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी मी एका चांगल्या भारतासाठी काम करत आहे.


'हाता'ला सचिन पायलट असे लागलेत


सचिन पायलट यांनी खासदार राहुल गांधी, प्रियंका गाधी-वाड्रा यांची भेट घेतली. या भेटीमागे राज्यातील नेते राजीव सातव यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. ते सचिन पायलट यांच्या सातत्याने संपर्कात होते. त्यांचा संपर्क हा कामी आला आहे. त्यांनी राहुल, प्रियंका यांची भेट घेतली. यावेळी सचिन पायलट पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रीय होण्यासाठी चर्चा झाली. हाय कमांडने पायलट व त्यांचे समर्थक आमदार यांचे म्हणणे ऐकले. सोनिया गांधी यांनी हे संकट सोडवण्यासाठी एक समिती स्थापन केली. मुख्यमंत्रीपदाबाबत सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही. सचिन पायलट यांनी सांगितले की, 'सन्मान आणि सन्मान कायम राहिला पाहिजे'. आमदारांच्या खरेदी-विक्रीवरील SOGच्या अंतिम अहवालात आमदारांवरुन पक्षविरोधाचे प्रकरण हटविला गेले. गेहलोत यांचे संकेत, हाय कमांडच्या निर्णयाला मान्यता आणि पायलट पक्षाला बळकट करण्यासाठी पुन्हा जोमाने काम करण्याविषयी सांगितले आहे.