तुमच्याही आधारकार्डवर बोगस सिमकार्ड रजिस्टर आहे का? पाहा कसं शोधायचं?
आता प्रश्न असा आहे की तुमच्या नावावर किती सिमकार्ड रजिस्टर आहेत हे कसं शोधायचं?
मुंबई : तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत. एक दोन तीन की 10 ते 12. तुमच्या नावावर बोगस सिमकार्ड असेल तर आताच सावध व्हा. ते कसं शोधून काढायचं आणि दूरसंचार विभागाने काय नवा नियम काढला आहे तेही जाणून घेऊया.
दूरसंचार विभागाने सांगितलेल्या नव्या नियमानुसार आता 9 पेक्षा जास्त सिम तुमच्या नावावर जर रजिस्टर असतील तर ती बंद होऊ शकतात. 9 पेक्षा जास्त सिमकार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला त्याचं वेगळं व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे.
आता प्रश्न असा आहे की तुमच्या नावावर किती सिमकार्ड रजिस्टर आहेत हे कसं शोधायचं? हे शोधण्यासाठी DoTने एक पोर्टल लाँच केलं आहे. telecom Analytics for fraud management and consumer protection असं या पोर्टलचं पूर्ण नाव आहे. TAFCOP असंही या पोर्टलला म्हटलं जातं.
या पोर्टलवर तुमची माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला समजू शकतं की तुमच्या आधारकार्डला किती सिमकार्ड लिंक आहेत. याशिवाय सिमकार्ड होल्डरचं नावही तुम्हाला समजणार आहे.
दूरसंचार विभागाने हे पोर्टल सुरू करण्यामागे आपला हेतू स्पष्ट केला आहे. या पोर्टलमुळे कोणालाही कळू शकतं की त्याच्या नावावर किती सिम आहेत. हे पोर्टल अशा लोकांना मदत करेल, ज्यांना त्यांच्या नावावर किती सिम चालू आहेत हे जाणून घ्यायचे आहे.
जर तुमच्या माहितीत नसलेला नंबर असेल तर तुम्ही त्याला ब्लॉक देखील करू शकता. यासाठी तुम्हाला https://www.tafcop.dgtelecom.gov.in/ या वेबसाईटवर लॉगइन करावं लागेल. तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपलोड करायचा आहे.
तुम्हाला वन टाइम पासवर्ड (OTP) मिळेल. ओटीपी सबमिट केल्यानंतर, एक यादी दिसेल, जिथून तुम्हाला कळेल की तुमच्या आधारवर किती क्रमांक नोंदणीकृत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही वापरत नसलेला नंबर ब्लॉक करायचा आहे. ग्राहकाला एक ट्रॅकिंग आयडी दिला जाईल,