Cleaning Tips: फ्रिजचा रबर घाण झाला आहे? अशा पद्धतीने झटपट स्वच्छ करा
रेफ्रिजेटर ही घरातील सर्वात महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक आहे. कारण फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ काही दिवसांपर्यंत आपल्याला टिकवता येतात. भाज्या आणि इतर अन्नपदार्थ ताज्या ठेवण्यासाठी फ्रिज (Refrigerator) महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे फ्रिज स्वच्छ असणं गरजेचं आहे.
How to Clean Refrigerator Gasket: रेफ्रिजेटर ही घरातील सर्वात महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक आहे. कारण फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ काही दिवसांपर्यंत आपल्याला टिकवता येतात. भाज्या आणि इतर अन्नपदार्थ ताज्या ठेवण्यासाठी फ्रिज (Refrigerator) महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे फ्रिज स्वच्छ असणं गरजेचं आहे. फ्रिजची साफसफाई करताना अनेकदा आपण रबर स्वच्छ करण्यास विसरतो. त्यामुळे त्यावर घाण जमा होते आणि रबर काळा पडतो. तसेच रबर अशाच स्थितीत राहिला तर दरवाजा व्यवस्थितरित्या बंद होत नाही. त्यामुळे कुलिंग कमी होतं आणि कालांतराने फ्रिज खराब होतो. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. त्या मदतीने फ्रिजचा रबर (Refrigerator Gasket) सहज स्वच्छ करण्यास मदत होईल.
बेकिंग सोडा- फ्रिजचा रबर स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी एक कप पाणी आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळून लिक्विड तयार करा. यानंतर स्वच्छ कपडा त्या मिश्रणात भिजवून त्याने रबर स्वच्छ करा. रबराच्या आत असलेली घाण स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ब्रशचा वापर करू शकता. सगळ्यात शेवटी सुख्या कपड्याने पुसून टाका.
व्हिनेगर- फ्रिजचा रबर घाण झाला असेल तर तुम्ही व्हिनेगरचाही वापर करू शकता. रबरावरील चिकटपणा यामुळे स्वच्छ होतो. यासाठी व्हिनेगर आणि पाणी यांचं मिश्रण करून ब्रशच्या मदतीने स्वच्छता करा. त्यानंतर कपड्याने पुसून काढा.
Knowledge News: ट्रेनच्या छतावर गोल झाकणं का असतात? जाणून घ्या या मागचं कारण
डिटर्जेंट- फ्रिजचा रबर स्वच्छ करण्यासाठी डिटर्जेंट पावडरचाही वापर करू शकता. एका पाण्यात थोडसं डिटर्जेंट टाका आणि जाड मिश्रण तयार करा. रबर व्यतिरिक्त डाग स्वच्छ होऊ शकतात. या मिश्रणाने डाग निघाले नाही तर लिंबूचा रस टाका. फ्रिज चकाचक होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा अवलंब करण्यापूर्वी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)