मुंबई : सरकारी नोकर्‍या आर्थिक स्थिरता देतात. त्यामुळे विशिष्ट टप्प्यानंतर अनेकजण सरकारी नोकरीच्या शोधात असतं.


हमखास सुट्ट्या, आरामात काम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षितता देणारी सरकारी नोकरी मिळवणं हे आजकाल सोप्प काम  राहिलेलं नाही. 
 नोकरीसाठी अधीर झालेले तरूण अनेकदा फसव्या जाहिरातीमध्ये अडकतात. यामुळे आर्थिक नुकसान आणि पश्चाताप होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच तुम्हांला कोणी मूर्ख बनवू नये म्हणून  या गोष्टींकडे वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे.  
 
 वयोमर्यादा - सरकारी भरतीच्या वेळे साधारण वयोमर्यादा ही 30-35 इतकी असते. त्यामुळे  जाहिरातीमध्ये चाळीशी पार केलेली वयोमर्यादा दाखवली असल्यास हा स्कॅम असू शकतो.
 
 भरतीसंख्या - अनेकदा खूप लोकं जाळ्यात अडकावी म्हणून भरती संख्या ही वाढवून चढवून दाखवली जाते. अनेकदा ती 5-10 हजार दाखवली जाते. 
 
 शिक्षण - फसव्या जाहिरातीमध्ये 8वी पास, 10पास उमेदवारांसाठी संधी असे आमिष दाखवले जाते. पण सरकारी नोकर्‍यांमध्ये आजकाल इतक्या कमी शिक्षणाए भरती करण्याचं प्रमाण अगदीच नगण्य आहे.  
 
 तुम्ही ऑनलाईन किंवा वर्तमानपत्रामध्ये सरकारी नोकरीची जाहिरात पाहिल्यास त्याला वेबसाईटवरही तपासून पहा. सरकारी वेबसाईट्सच्या शेवटी .nic.in किंवा .gov.in असते.