Ghee Making Ideas : तूप कढवण्याची योग्य आणि सोप्पी पद्धत माहित आहे का ? पाहा पूर्ण Video
Ghee making ideas : भेसळयुक्त किंवा अशुद्ध तूप खाण्याने गर्भपाताचाही धोका असतो. गर्भवती महिलांनी घरी बनवलेलं तूप खावं
Ghee making At home : तूप आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे असं म्हणतात. तुपामध्ये अनेक असे गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीरातील अनेक गोष्टींची कमी भरून निघते आणि, आरोग्याला अनेक फायदे होतात. आपण बऱ्याचदा बाजारातून विकतच तूप घरी घेऊन येतो, पण हेही माहित आहे की तुपामध्ये अनेक प्रकारची भेसळ केली जाते. असं तूप खाल्ल्याने फायदा होण्याऐवजी शरीरच नुकसानच जास्त होतं हे नक्की.
मग अश्यावेळी घरच्या घरी तूप कसं बनवायचं आणि तेही एकदम सोप्प्या पद्धतीने. (how to make pure ghee at home )
कृती
1) दूध तापवून संपूर्ण थंड झाले की त्यावरची साय काढून झाकून फ्रीज मध्ये ठेवावी. अशीच 3 दिवस साय साठवून ठेवावी, फक्त दर वेळेला नवी साय घातली की हलवून घ्यावे. म्हणजे साय कडवट होत नाही.
2) चौथ्या दिवशी साय घालावी आणि त्याच्या सोबत थोडे विरजण म्हणजे दही घालावे. आणि चांगले ढवळून 5-6 तास रात्रभर साय फ्रीज बाहेरच ठेवावी. म्हणजे मलईला चांगलं विरजण लागते.
3) दुसऱ्या दिवशी सकाळी साय फ्रीज मध्ये ठेवून द्यावी.आणि आता दररोज येणारी दुधावरची साय यामध्ये घालून रोजच्या रोज चांगले मिसळून घ्यावे, म्हणजे वरची साय चांगली मिसळली जाते आणि पिवळी होत नाही, कडवट होत नाही किंवा बुरशी येत नाही.
4) पुरेशी साय जमा झाली की जमा झालेले सायीचे दही फ्रीझ बाहेर काढून घुसळून घ्यावे. पाणी न घालता आधी चांगले घुसळून घ्यावे, थोडा तेलकट थर जमा होतोय असे वाटू लागले की थंड पाणी मिसळावे, थंडाव्यामुळे लोणी एकत्र येऊन वर गोळा होतो.
5) लोणी काढून दुसऱ्या भांड्यात काढावे, लोणी 2-3 वेळा स्वच्छ धुवून ते पाणी जमा झालेल्या ताकात मिसळावे.
6) तयार लोणी मंद आचेवर जाड तळाच्या भांड्यात कढवण्यासाठी ठेवावे. सुरुवातीला पाणी सुटून फेस येतो, पाण्याचा आवाज कमी होईल तसं तूप कढलं असं समजावं, मध्ये मध्ये ढवळत राहावं
(video credit : saritaskitchenofficial instagram)
7) पाण्याचा आवाज कमी झाला की गॅस बंद करून त्यात तुळशी पान / खाऊचे पाने / खडे मीठ घालून घालावे, थोडा पाण्याचा शिंतोडा देवून झाकून ठेवावे.
8) थंड झाले की गाळून काचेच्या बरणीत किंवा स्टील च्या डब्यात भरून ठेवावे.