How to Make perfect dosa at home: रोज सकाळी नाश्ता काय बनवायचा हा मोठा प्रश्न गृहिणींना पडतो, बरं रोज-रोज तोच नाश्ता करून कंटाळा सुद्धा येतो मग  घरातून फर्माईश येते कि आज काहीतरी नवीन खायचं आहे ,पण नेमकं काय नवीन खाऊ बनवायचा आणि त्यात बऱ्याचदा होत असं कि नवीन काहीतरी करायच्या नादात आपला पदार्थ बिघडून जातो आणि मग होते पंचाईत. (easy quick breakfast recipe ideas)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोहे उपम्यासोबत आपल्याकडे साउथचे इडली डोसेसुद्धा (idali, dosa ) मोठ्या प्रमाणात बनवले जातात, पण बऱ्याचदा डोसे बनवताना ते चिकट,गचगचीत बनतात वातट होतात, डोश्यांचं पीठ हवं तस भिजलं जात नाही.


आणखी वाचा : cooking tips : पुऱ्या तळताना खूप तेल सोकतात का? 'या' टिप्स वापरा...पुऱ्या होतील ऑइल फ्री


आणि आता तर थंडी चालू झाली आहे अश्यात पीठ लवकर आंबतसुद्धा नाही. (Instant dosa Recipe) आणि मग डोसे एकतर तव्याला चिकटत राहतात नाहीतर एकदम प्लेन दिसतात.


अगदी कुरकुरीत जाळीदार परफेक्ट डोसा कसा बनवायचा हा प्रश्न तुम्हालाही त्रास देत असेल तर परफेक्ट हॉटेल स्टाईल डोसा तोही काहीच मिनिटात कसा बनवायचा. थंडीच्या दिवसात पीठ आंबायला बराचेळ लागतो. (easy quick breakfast recipe ideas)
रात्रभर भिजवूनही पीठ हवंतसं फुलून येत नाही. तर कधी डोसे तव्याला चिकटतात. कधी प्लेन दिसतात. सॉफ्ट, कुरकरीत जाळीदार डोसा बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (How to make Instant dosa)
चला तर जाणून घेऊया सोपी आणि इन्सटंन्ट डोसा रेसिपी 


साहित्य


तांदूळ भिजवून घ्या - १ कप 
किसलेला नारळ- १ कप 
गरजेनुसार पाणी 
ड्राय यीस्ट - १ चमचा
साखर - १ चमचा
मीठ - चवीनुसार


कृती 


जाळीदार डोसे बनवण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड घ्या त्यात आधी भिजवलेले तांदूळ घ्या ते दळून घ्या दळल्यानंतर याचे दोन भाग करून घ्या.


अर्ध मिश्रण एका वेगळ्या भांड्यात काढा आणि उरलेलं  पातळसर मिश्रण एका पॅनमध्ये काढून घ्या,काही वेळ हे मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्या आणि थंड होऊ द्या .


हे मिश्रण थंड झाल्यावर पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्या.  आता यात गरजेनुसार साखर मीठ ड्राय यीस्ट घालून थोडावेळ झाकून ठेवा


हे मिश्रण थंड झाल्यावर पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्या.  आता यात गरजेनुसार साखर मीठ ड्राय यीस्ट घालून थोडावेळ झाकून ठेवा



या नंतर मिश्रण चांगल्यापैकी फुगेल डोश्यांचं इन्स्टंट पीठ तयार आहे आता फक्त डोसे घालण्याच्या तव्यावर मस्त डोसे बनवा खायला कुरकुरीत खमंग आणि जाळीदार डोसे बनवून तयार. 


सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर akshayaascameo  नावाने एक गृहिणी कूकिंगचे वेगवेगळे धडे देत असते त्यांनीच त्यांच्या पेजवर हा सोपा डोसे बनवण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.


चला तर मग तुम्ही झटपट डोसे घरी एकदा नक्की करून पहाच.