Makar Sankranti 2023 : आता चिंता नको, मकर संक्रांतीसाठी असे बनवा जिभेवर विरघळणारे तिळाचे लाडू
Makar Sankranti 2023 : तिळाचे लाडू, हा एक असा पदार्थ जो सर्वांनाच जमतो असं नाही. काहींना पाकच जमच नाही, काहींचे लाडू खायचे म्हणजे हातोडी घेऊन बसायचं का असाही प्रश्न पडतो. पण, आता ती चिंता मिटेल.
Makar Sankranti Til Laddu Recipe 2023 : मकर संक्रांत जवळ आली की वेध लागतात ते म्हणजे हळदी कुंकू समारंभांचे, तिळापासून तयार करण्यात आलेल्या विविध पदार्थांचे आणि तिळाच्या लाडवांचे. (Winter recipe) हिवाळा चांगलाच जोर पकडत असताना हा सण येतो. (Astrology) ज्योतिषविद्या आणि धार्मिक दृष्टीनं पाहायचं झालं तर या सणाचं मोठं महत्त्वं आहे. सोबतच खवैय्यांसाठीसुद्धा (Winter food) या सणाच्या दिवसांत चमचमीत आणि जिभेचे चोचले पुरवणाऱ्या पदार्थांची रेलचेल असते. (How To Make Soft Til Gul Ladoo at Home Makar Sakranti Til Sesame Laddu Recipe Kitchen Hacks Marathi)
मकर संक्रात (Makar Sankranti 2023 ) म्हटलं की घराघरांमध्ये हमखास तिळाचे लाडू बनवण्याचा घाट घातला जातो. पण, हे लाडू बनवणं ही काही सोपी बाब नाही बरं. कारण, गुळाचा पाक, तिळाचं प्रमाण, तिळाचा प्रकार आणि योग्य प्रमाणात शेंगदाण्याचा कुट पडला तरच हे लाडू व्यवस्थित होतात. नाहीतर कुणाचे लाडू कडक, कुणाचे रबरासारखे चावताही न येणारे आणि कुणाचे निगोड होतात. काहीजणी तर हे लाडू व्यवस्थित होत नाहीत म्हणून तो बनवण्याचा घाटच घालत नाहीत. अशा मैत्रीणींकडून बाजारात मिळणाऱ्या रेडिमेड लाडवांना (readymade til laddu) प्राधान्य दिलं जातं.
हेसुद्धा वाचा : Makar Sankrant 2023 : मकर संक्रांतीच्या दिवशी 'या' राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल!
तुम्हीही असंच करताय का? यंदाच्या वर्षी जरा नव्या पद्धतीनं तिळाचे लाडू करून तर पाहा. ते नीट झालेच नाहीत तर तुमच्याकडे इतर पर्याय आहेत की....
तिळाचे लाडू करण्यासाठीचं साहित्य...
(white Sesame Seeds) पांढरे तीळ (पाव किलो)
शेंगदाणे (एक पेला)
गुळ (250 ग्रॅम/ गुळाची पावडर असल्यास उत्तम)
वेलची पूड (गरजेनुसार)
तूप (एक चमचा)
कृती
- सर्वप्रथम एक तवा गरम करून त्यामध्ये तीळ अगदी मंद आचेवर भाजून घ्या. तीळ करपणार नाहीत याची काळजी घ्या. साधारण सोनेरी रंग आल्यावर गॅस बंद करा.
- तिळाचा रंग पांढऱ्याहून सोनेरी झाल्यानंतर आता ते एका भांड्यात काढून घ्या जिथं ते पूर्णपणे थंड होतील. त्यातून साधारण दोन चमचे तीळ बाजूला ठेवा.
- तिळाप्रमाणेच शेंगदाणेही खरपूस भाजून घ्या आणि थंड होताच त्यांची भरड करा.
- आता एका मिक्सरमध्ये तीळ, गुळाची पूड किंवा बारीक कापलेला गुळ, वेलची पूड आणि तूप एकत्र करून हे मिश्रण वाटून घ्या. तिळाची पेस्ट होईपर्यंत वाटू नका. मिश्रण भरडच ठेवा.
- आता हे वाटलेलं मिश्रण एका भांड्यात घेऊन त्यामध्ये दाण्याचा कुट मिसळा आणि लाडू तुम्हाला हवेत तितक्या आकारात वळून घ्या.
- लाडू वळताना हाताला तूप लावा म्हणजे मिश्रण चिकटणार नाही.