Extramarital Affair : लग्न हे एक पवित्र नातं आहे, तुम्ही लव्ह मॅरेज (Love Marriage) करत असाल किंवा अरेंज्ड मॅरेज (arranged marriage) करत असाल, तर ते नातं शेवटपर्यंत टिकवण्याची जबाबदारी पती आणि पत्नी दोघांची असते. दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली तर दोघांमध्ये वादाची ठिणगी पेटण्यास सुरुवात होते. त्यामुळे जर तुमचं एखाद्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध असेल तर वेळेच या नात्यातून बाहेर येणं फार महत्त्वाचं असतं. लग्नानंतर पुरुषाने किंवा स्त्रीने इतर कोणाशीही संबंध ठेवणे योग्य नाही. याकडे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणून पाहिले जाते. (Extramarital Affair)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Extramarital Affair मधून कसं पडाल बाहेर? 
- जेव्हा एखादी स्त्री किंवा पुरुष आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीशी मानसिक किंवा शारीरिक संबंध बनवतो तेव्हा त्याला एक्स्ट्रा अफेअर असं म्हणतात. 


- चूक लक्षात आल्यानंतर ती मान्य करणं फार धैर्याचं काम आहे. चूक मान्य केल्यानंतर तुमचे वैवाहिक जीवन पुन्हा रुळावर आणू शकता. जाणून घ्या, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमधून कसं बाहेर पडायचं.


- तुमच्या पार्टनरला अफेअरबद्दल सर्व काही खरं-खरं सांगा. कोणत्या परिस्थितीत तुम्ही हा टोकाचा निर्णय घेतला हे पार्टनरला पटवून द्या. 


- ज्या व्यक्तीसोबत तुमचे  विवाहबाह्य संबंध आहेत, त्या व्यक्तीसोबत संपर्क ठेवू नका. 


- चुका लक्षात आल्यानंतर स्वतःला दोषी ठरवून नराज होवू नका. तुमच्या पार्टनरची माफी मागा आणि पुन्हा सर्व काही सुरळीत करण्याचा प्रयत्न करा. 


- ज्या व्यक्तीसोबत तुमचे  विवाहबाह्य संबंध असतील त्याच्यासोबत तात्काळ बोलणं बंद करू नका. परस्पर संमतीने नातं संपवा. 


- कोणत्याही मोठ्या समस्येला तोंड देण्यापेक्षा चांगले आहे, तुम्ही तुमच्या मानोसोपचार तज्ज्ञाचा सल्ला एकदा अवश्य घ्या.