Home Loan Tips: तुम्ही किंवा तुमच्या घरी किंवा मित्र मंडळींपैकी कुणीना-कुणी होम लोन नक्की घेतलं असेल. या होम लोनवर तब्बल 7 ते 8 टक्के व्याज भरावं लागतं. अशात महागाईचे आकडे नियंत्रणात आणण्यासाठी RBI देखील गृहकर्जाचे व्याजदर वारंवार वाढवत चाललं आहे. म्हणजेच तुमचं संपूर्ण कर्ज संपेपर्यंत तुम्ही घेतलेल्या एकूण कर्जाच्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम तुम्हाला बँकेला भरावी लागते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, तुम्हाला तुमचं कर्ज व्याजमुक्त करायचं आहे का? हो तुम्ही असं करू शकतात. यासाठी तुम्हाला आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरून तुम्ही तुमचं कर्ज व्याजमुक्त करू शकतात. कदाचित तुम्हाला तुमच्या व्याजाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कमही मिळू शकते.


एका उदाहरणाच्या माध्यमातून हिशोब समजून घेऊयात 


गृहीत धरुयात तुमच्या कर्जाची एकूण रक्कम 20,00,000 लाख रुपये आहे आणि तुम्ही 20 वर्षांसाठी 7.5 टक्क्यांनी गृहकर्ज घेतलं आहे. या पूर्ण कालावधीत तुम्ही तब्बल 18,66,847 रुपये व्याज भारतात. 



आता जाऊन घेऊयात व्याजाची रक्कम कशी शून्य कराल याबाबत 


तुम्हाला तुमच्या कर्जावरील व्याजाची रक्कम शून्य करायची असल्यास कर्जाच्या एकूण रकमेच्या 0.01 टक्के किमतीची SIP करावी लागेल. वरील हिशोबाप्रमाणे 0.01 टक्के किमतीची म्हणजे 2000 रुपयांची SIP  तुम्हाला करावी लागेल. 


जर तुम्हाला तुमच्या SIP वर दरवर्षी 12% परतावा मिळाला तर 20 वर्षानंतर तुमची मॅच्युरिटी रक्कम तब्बल 19.98 लाख रुपये मिळू शकते. यामध्ये तुमची गुंतवणूक 4.8 लाख तर तुम्हाला जवळजवळ 15.18 लाखांचा फायदा होतो. म्हणजे 20 वर्षांत तुमच्याकडे तुमच्या गृहकर्जाच्या व्याजापेक्षा जास्त रक्कम जमा होते.   



जर तुम्हीही होमलोन घेतलं असेल तर तुम्हाला ही भन्नाट ट्रीक नक्कीच फायद्याची ठरेल. त्यामुळे तुमचा नक्कीच फायदा होऊ शकेल. 


how to save interest on home loan