IMPS (Immediate Payment Service): तंत्रज्ञानाच्या युगात अनेक व्यवहार सुलभ झाले आहेत. ऑनलाईन सेवांमुळे बँकिंग करणंही सोपं झालं आहे. एखाद्याला पैसे पाठवण्यापासून बिल भरणं चुटकीसरशी होत आहेत. अशीच एक आयएमपीएस सुविधा आहे. आयएमपीएस माध्यमातून लोकांना त्यांच्या बचत खात्यातून रिअल टाइम पैसे पाठवण्याची आणि घेण्याची सुविधा देते. ही सेवा मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगद्वारे आंतर बँक व्यवहारांची सुविधा प्रदान करते. ही सेवा 24x7 आणि 365 उपलब्ध आहे. म्हणजेच सुट्टीच्या दिवसातही तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. आयएमपीएस ही सुविधा खास मोबाईलसाठी डिझाईन केली आहे. इतर व्यवहारांसाठीही तुम्ही आयएमपीएस सुविधा वापरू शकता.  P2P आणि P2M पेमेंटसाठी देखील वापरू शकता. P2P आणि P2M दोन्ही मोड ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन व्यापारी पेमेंट, विमा प्रीमियम पेमेंट, ओटीसी पेमेंट, शाळा आणि कॉलेजेसची फी पेमेंट, युटिलिटी बिल पेमेंट, ट्रॅव्हल आणि तिकीट पेमेंटसाठी वापरता येऊ शकते. फंड ट्रान्सफरच्या इतर पद्धतींच्या तुलनेत आयएमपीएस वापरण्यास अतिशय सोपे आहे. पैसे हस्तांतरित करण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेला मोबाइल नंबर आणि रिसीवरच्या यूनिक एमएमआयडी आवश्यक आहे.


आयएमपीएसद्वारे फंड ट्रान्सफर कसा कराल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला संबंधित बँकेचे मोबाइल बँकिंग अॅप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागेल. जसे की SBI Anywhere, I Mobile Pay इ. तुम्ही नेट बँकिंग वापरूनही पैसे ट्रान्सफर करू शकता. यासाठी तुमची क्रेडेन्शियल्स (यूजर आयडी/ग्राहक आयडी आणि पासवर्ड) वापरून लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर, फंड ट्रान्सफरवर क्लिक करा आणि लाभार्थी अॅड करा किंवा वन टाइम ट्रान्सफर मेथड निवडा. तुम्ही MMID आणि मोबाईल नंबर तपशील किंवा खाते क्रमांक आणि IFSC कोड देऊन IMPS वापरू शकता. लाभार्थीचे नाव, लाभार्थीचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, लाभार्थी MMID आणि हस्तांतरित करावयाची रक्कम एंटर करा. त्यानंतर टर्म आणि अटी मान्य करा. आणि व्यवहाराची पुष्टी करा.


बातमी वाचा- पॅकेजिंगसाठी 1 जानेवारी 2023 पासून नवे नियम लागू, काय बदल होणार जाणून घ्या


आयएमपीएसचा फायदा काय


आयएमपीएस हा निधी सहजपणे हस्तांतरित करण्याचा एक सोयीस्कर पर्याय आहे. बँकेच्या सुट्टीतही आयएमपीएस 24×7 वापरू शकता. ही सेवा तुम्हाला कुठेही आणि कधीही निधी हस्तांतरित करण्याची परवानगी देते. त्यातून तुम्ही 2 लाख रुपये ट्रान्सफर करू शकता. आयएमपीएसचे शुल्क देखील अतिशय नाममात्र आहे.