India Railway Rules: भारतील रेल्वेदेखील आता बदलत्या काळानुसार अपग्रेड होत आहे. आता लोक घरातल्या घरात बसून तिकिट बुकिंग करु शकता. IRCTCच्या वेबसाइटवरुन लगेचच तिकिट कन्फर्म होतो. तसंच, त्यासाठी कोणत्या एजंटचीही मदत घ्यावी लागत नाही. त्यामुळं प्रवाशांचा वेळही वाचतो. तसंच, रेल्वे स्थानकातील गर्दीही कमी होते. आयआरसीटीच्या माध्यमातून तिकिट बुक करणे अगदीच सोप्प आहे . मात्र पहिल्यांदाच तिकिट बुक करताना काही चुका होतात. पण आता त्याचे टेन्शन घेण्याची गरज नाही. काही चुका तुम्ही आरामात दुरुस्त करु शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेचे तिकिट बुक करताना होणारी सगळ्यात मोठी चुक म्हणजे प्रवाशांचे चुकीचे नाव टाकणे. रेल्वे तिकिटांवर चुकीचे नाव प्रिंट झाल्यास प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र, ई-तिकिटांवर चुकीची माहिती भरल्यास तुम्ही ते लगेचच दुरुस्त करु शकता. यासाठी आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरुन तुम्ही सोप्या पद्धतीने तुमची चूक सुधारु शकणार आहात. 


ई-तिकिटांवर प्रवाशांचे नाव चुकीचे टाइप झाले असेल तरी टेन्शन घेऊ नका. तुमच्या हातात 24 तास आहेत. या 24 तासांत तुम्ही जवळच्या रेल्वे स्थानकात जाऊन तुमची चूक दुरुस्त करु शकता. तुमचा प्रवास सुरु करण्याच्या २४ तासांआधी जवळच्या रेल्वे स्थानकात जा त्यानंतर तिथे असलेल्या स्थानकात तुम्हाला चीफ रिजर्व्हेशन सुपरवायझर यांना भेटावे लागेल. कारण चीफ रिझर्व्हेशन सुपरवायझरच तुमच्या तिकिटांवर झालेला नावाचा गोंधळ दुरुस्त करु शकेल. 


सुपरवाइजरला भेटल्यानंतर त्याला तुम्ही काढलेले वॅलिट ई-तिकिट दाखवा त्याचबरोबरसोबत कोणतेही अधिकृत आयडीप्रुफ न्यायला विसरु नका. आधारकार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सुपरवायजरला दाखवावे लागणार आहे. त्यानंतर तुमच्याकडून नावात झालेली गडबड सविस्तर सुपरवायजरला सांगा. सुपरवायझरला तुमच्याकडून झालेली चुक सांगितल्यानंतर आणि तुमचे आयडीप्रुफ तपासल्यानंतर चीफ रिझर्व्हेशन सुपरवायझर तिकिटांवर स्टॅम्प देईल. त्यानंतर प्रवास करण्यासाठी तुमचं तिकिट वैध असणार आहे. 


तिकिट बुक करताना वय आणि लिंग याबाबत काही चुकी झाल्यास हाच पर्याय वापरुन तुम्ही चुकी सुधारु शकता. त्यामुळं आता तिकिट बुक करताना चुक झाल्यास घाबरण्याची गरज नाहीये.


आणखी एक पर्याय उपलब्ध


तिकिट बुक करताना झालेली चुक तुम्हाला लक्षात आली नसेल किंवा तुम्हाला कोणत्या कारणास्तव CRSकडे जाण्यास वेळ मिळाला नसेल तरीदेखील तुम्ही निश्चिंतपणे प्रवास करु शकता. फक्त तुम्हाला काही कादगपत्रे जवळ बाळगावी लागणार आहेत. तुमचं नाव, वययाची प्रमाणपत्रे सोबत घेऊन चला. प्रवास करताना तुमच्याजवळ टीसीने तिकिट मागितले तर त्याला तुमच्याकडून झालेली चूक सांगा आणि तुमचे कादगपत्रेही दाखवा. साधारणतः अशी चूक झाल्यास टीसी तुमची चुकी मान्य करुन तिकिट वैध असल्याचे प्रमाण देतो. त्यामुळं घाबरुन जायची गरज नाही.