Mutual Fund SIP तून पैसे कसे काढायचे? त्यावर Tax लागतो का? जाणून घ्या सोप्पी पद्धत
SIP Investment Tips: एसआयपीमध्ये आजकाल आपण सगळेच गुंतवणूक करतो त्यासाठी आपल्यालाही काही गोष्टींची खातरजमा (SIP Redemption) करावी लागते. एसआयपीतून तुम्ही जर का पैसे काढणार असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
SIP Investment Tips: सध्याच्या जमान्यात आपल्याला महागाईनं (Inflation) घेरलं आहे त्यामुळे अशावेळी आपल्या पगारातून हलकिशी रक्कम बाजूला काढून आपल्यालाही त्यातून गुंतवणूक (Investment) करता येते. त्यासाठी आपल्यापैंकी अनेक जण ही म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund Investment) गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेतात. आपल्या पगारातील ठराविक रक्कम ही आपण आपल्या एसआयपी अकांऊटमध्ये (SIP) ठेवू शकता. त्यासाठी आपल्याला गुंतवणूकीचे प्लॅनिंग करावे लागते. सर्वप्रथम आपल्या पगारातील किती टक्के रक्कम आपण या मुच्युअल फंडमध्ये गुंतवू शकतो, याबद्दलही आपल्याला माहिती काढणं आवश्यक ठरते. (How to withdraw money from mutual fund sip does it really have tax business news in marathi)
एसआपीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर एसआयपीमधून (How to withdraw Money From SIP) तुम्ही पैसे कसे काढू शकता याकडेही तुम्ही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. याबद्दलही अनेक समज आणि गैरसमज आहेत. एसआयपीतून पैसे काढताना टॅक्स (Does SIP Have Tax) काढताना खरंच टॅक्स लागतो का? यावरही अनेकांमध्ये गैरसमज आहेत. आपल्याकडे सोप्पा गुंतवणूकीचा मार्ग असतो तो म्हणजे एसआयपीचा. त्यामुळे आपणही याला चांगल्या गुंतवणूकीसाठी पाहतो. कुठल्याही बॅंकांच्या आधारानं आपण त्यातून पैसे काढू शकतो. यासाठी आपल्यालाही मुच्युअल फंड एजंटशीही बोलावे लागते. परंतु एकदा मुच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला रिडेप्शनच्या (Redemptions) वेळी पैसे काढताना अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते असे काही लोकांचे म्हणणे असते.
एसआयपीतून पैसे काढल्यानंतर कर लागतो का?
एसआयपीतून आपल्याला पैसे काढताना कर भरावा लागतो का यासंदर्भातही अनेक समज - गैरसमज आहेत. परंतु जाणकारांच्यानुसार, येथे कर दायित्व आणि गुंतवणूक उद्दिष्टावर (Investment Goals) भर देणे आवश्यक आहे. तुम्ही जर का एसआयपीमध्ये (SIP Investment) पैसे गुंतवणार असाल तर तुम्हाली रिडेम्शनकडे Tax on Redemptions) लक्ष द्यावे लागणार आहे. त्यातून यावेळी तुमचा लॉन इन पीरियड (Lock In Period) काय आहे हे तपासा कारण तुम्ही एसआयपीमध्ये किती कालावधीसाठी पैसे ठेवले आहेत. हेही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही जर आज एसआयपीमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला 3 वर्षांनी ते पुढील 3 महिने आणि 1 वर्षांनी पैसे काढू शकता. भारतात लघू किंवा दीर्घ कालावधीकरिता (Long Term Invsetment) म्युच्युअल फंड रिडंप्शनवर टॅक्स लागू शकता. तेव्हा तुमच्या रिडंप्शनवर (SIP and Lump Sum Investment) कर लागू शकतो.
कसली काळजी घ्या?
तुम्हाला जर का तात्काळ पैसे काढायचे असतील. तर तुम्हाला एक्डिट लोडचा (Exit Load) प्रश्न समोर येऊ शकतो कारण गुंतवणूकीच्या (Investment) एका वर्षाआधीच जरा का तुम्ही पैसै काढलेत तर तुम्हाला एक्डिट लोड भरावा लागतो.
तुम्हाला रिडेप्शनचे काही युनिट्स भरावे लागतात जे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीनं भरू शकता. यासाठी तुम्हाला वेगळ्या काहीच गोष्टी करण्याची गरज नसते. यातील तुम्ही काही नियम पाळलेत तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होऊ शकतो.
तुम्ही बॅंकेत जाऊन ही प्रक्रिया पुर्ण करू शकता. तर ऑनलाईनद्वारे एएमसीसारख्या (AMCs) संस्थांकडून माहिती घेऊ शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)