मुंबई : ईपीएफ हा साधारणपणे पगाराच्या 12% कापला जातो. यामध्ये कर्मचारी आणि कंपनी दोघेही समान हिस्सा देतात. त्यावर काही इंटरेस्ट दिला जातो. अशा स्बरूपात कर्मचार्‍यांचा पीएफ अकाऊंटमध्ये भविष्यनिधी तयार होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकरदार मंडळी त्यांच्या गरजेनुसार निवृत्ती आधीदेखील पीएफ अकाऊंटमधील पैसे काढू शकतात. पण पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते ? हे अनेक मंडळींना ठाऊक नसते. त्यामुळे वेळीच जाणून घ्या पीएफ काढण्याचे काही सोप्पे पर्याय  


ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन 


घरबसल्यादेखील तुम्ही पीएफमधील रक्कम काढण्यासाठी क्लेम करू शकता. ईपीएफओ ने 4 कोटींहून अधिक नोकरधारकांना ऑनलाईन पीएफ क्लेम करण्याची सुविधा दिली आहे. 


ऑनलाईन क्लेम केल्याने तुमची ईपीएफ  ऑफिसमध्ये होणारी पायपीट कमी होते. सोबतच तुमच्या अकाऊंटमध्ये सुमारे 2 आठवड्याच्या वेळेतच पैसे जमा होतात.  


 


कसे कराय अप्लाय ?  


पीएफ काढण्यासाठी ईपीएफओच्या वेबसाईटवर क्लिक करा. 
त्यानंतर फॉर्म 31,19,10 सी चा ऑप्शन तुम्हांला मिळेल. 
तुमच्या गरजेनुसार योग्य फॉर्म भरा. 
फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही सारी माहिती तपासून पहा तसेच केवायसी अपडेट करा.  
केवायसी योग्य नसेल किंवा भरला नसेल तर या  प्रक्रियेमध्ये अडचणी येऊ शकतात. 
ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशनसाठी अ‍ॅपचाही वापर करू शकता.  


दोन आठवड्यात मिळतील पैसे 


KYC पूर्ण झाल्यानंतर तुम्हांला अकाऊंट नंबर द्यावा लागतो. यासोबत तुम्हांला पॅनकार्ड क्रमांक, आधार क्रमांक, यूएएन  क्रमांक द्यावा लागतो. 
फॉर्म सादर केल्यानंतर पैसे खात्यामध्ये येण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.