नवी दिल्ली : तुम्ही ४०० वर्षे जगू शकता असा विश्वास योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केला आहे. १२ व्या 'नॅशनल क्वालिटी कॉन्क्लेव्ह'मध्ये ते बोलत होते. आपण अतिभोजन आणि चुकीच्या जीवन शैलीमुळे आपल्या शरीरावर अत्याचार करतो. त्यामुळे रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजार तसेच इतर आजारही होतात. परिणामी आयुष्य कमी होतं आणि उरलेलं आयुष्य औषधांवर काढावं लागत असे रामदेव बाबा यांनी सांगितले. 


माणसाला आजारी पडण्यासाठी चुकीची जीवनशैली कारणीभूत असते. त्यामूळेच माणसाचा अकाली मृत्यू होतो. असे रामदेव बाबा यांनी सांगितले. म्हणून योग्य आहार आणि नियमित व्यायाम करा आणि आजारांपासून मुक्ती मिळवा, असा आरोग्यमंत्रच बाबा रामदेव यांनी यावेळी दिला आहे.