मुंबई : आपल्या सगळ्यांना तर हे माहित आहे की, आपल्या बोटांना ठसे असतात, जे सगळ्यात युनिक असतात. म्हणजेच तुमच्या बोटांचा ठसा, हा कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीशी कधीही मॅच होणार नाही. बोटांच्या ठसाला फिंगरप्रिंट देखील म्हणतात. या फिंगरप्रिंटचा वापर आपण आधार कार्डसाठी, बँकेच्या कामांसाठी, तसेच मोबाईलचा लॉक खोलण्यासाठी वापरतो. यासंबंधीत मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनात काही वेगळ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये शास्त्रज्ञ म्हणतात, की या बोटांच्या ठशांमुळे वस्तू पकडण्याची क्षमता कमी होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा स्थितीत तुमच्या मनात प्रश्न उपस्थीत झाला असे की, हे कसं शक्य आहे, नक्की फिंगरप्रिंटचे काम तरी काय आहे?


चला तुमच्या मनात उभे राहिलेल्या या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ या.


वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी बोटांच्या ठशांची वेगवेगळी कार्येही सांगितली आहेत.


उदाहरणार्थ, काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, ते बोटांच्या संवेदनशीलतेला प्रोत्साहन देतात. म्हणजेच, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला स्पर्श करतो तेव्हा आपल्याला ती वस्तु कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी मदत होते. अशाप्रकारे, ते बोटांना सुरक्षित ठेवण्यासाठी देखील कार्य करतात.


काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, ते वस्तूंना जागेवर ठेवण्यास मदत करते. त्याच वेळी, कोलोरॅडोच्या शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, काही बोटांच्या ठशांवर बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे ते वेगळे होतात, म्हणजेच हातातील जीवाणूंच्या वाढीमध्ये बोटाची भूमिका असते.


बोटांचे ठसे अद्वितीय असतात हे सर्वांनाच माहीत आहे, पण ते तीन प्रकारचे असतात हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की, तिन प्रकारचे कसे काय फिंगरप्रिंट असू शकतात? ते तर असंख्य प्रकारचे आहे....


पण हे तसे नाही. प्रत्येकाच्या फिंगरप्रिंटची एक डिझान असते ती तिन प्रकारची असते.



 त्यांना कमान, लूप आणि व्हर्ल पॅटर्न म्हणतात. मुलामध्ये बोटांचे ठसे तयार होणे तेव्हाच सुरू होते जेव्हा तो आईच्या पोटात फक्त 7 महिन्यांचा असतो. 


जगात असे काही लोक आहेत ज्यांच्या बोटांचे ठसे देखील नाहीत. या स्थितीला डर्माटोग्लिफिया म्हणतात. हा एक दुर्मिळ जनुकीय आजार आहे. या आजाराने जन्मलेल्यांच्या हाताचे ठसे नसतात.