पत्नीचे व्हॉट्स अॅप चॅटींग वाचून नवरा चाट; घटस्फोटासाठी कोर्टात धाव
अनेकांच्या वैवाहिक जिवनातील तणावात सोशल मीडिया हा प्रमुख घटक ठरू पाहतोय.
नवी दिल्ली: अनेकांच्या वैवाहिक जिवनातील तणावात सोशल मीडिया हा प्रमुख घटक ठरू पाहतोय. दिल्लीतील एका युवकाने आपल्या पत्नीने तिच्या मोबाईलवरून केलेले व्हॉट्स अॅप चाटींग पाहून थेट न्यायालयात धाव घेतली आहे. या तरूणाने पत्नीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायालयाकडे थेट घटस्फोटासाठी मान्यता द्यावी अशी विनंती केली आहे. दरम्यान, पतीने केले सर्व आरोप पत्नीने फेटाळले आहेत.
विवाहानंतर एकाच वर्षात संबंध दुरावले
दिल्लीतील या जोडप्याचा विवाह एक वर्षापूर्वी (७ मे) झाला आहे. हुंडा न घेता कोणत्याही प्रकारे गाजावाजा न करता हा विवाह संपन्न झाला. तरून हा भागीरथी विाहर येथे राहणारा आहे तर, त्याची पत्नीचे माहेर शाहदरा येथील आहे. दरम्यान, या तरूणाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, लग्नानंतर पती-पत्नी म्हणून आम्ही कधीही एकत्र आलो नाही. ती नेहमीच माझ्यापासून दूर रहायची. माझ्यासोबत शरीरसंबंध करायला ती केव्हाही तयार झाली नाही. कोणत्याही प्रकारे शरीरसंबंध ठेवण्यास तिने नकार दिला होता. आमच्यातील संबंध चांगले नव्हते.
अनेक तरूणांसोबत अश्लील चॅटींग..
दरम्यान, याच याचिकेत तरूण पुढे म्हणतो, 'पत्नी रात्री उशीरपर्यंत मोबाईलवर चॅट करत असायची. एकदा मी तिचा मोबाईल पाहिला. तर, तिच्या व्हॉट्स अॅपवर ती चॅट करत असल्याचे मला लक्षात आले. तीने केलेले व्हॉट्सअॅप चॅट मी वाचले. तेव्हापासून मला धक्काच बसला आहे. ती अनेक तरूणांच्या संपर्कात होती. तसेच, त्यांच्यासोबत ती अश्लील चॅट करायची. ती त्या तरूणांना अश्लील फोटोही पाठवत असे', असा आरोप तरूणीने याचिकेत केला आहे. महत्त्वाचे असे की, पुराव्यादाखल या तरूणाने न्यायालयात एक हार्डडिस्कच जमा केली आहे. 'माझा संपूर्ण पगार पत्नी स्वतःकडेच घ्यायची. त्यामुळे पगाराच्या पैशातून कुटुंबातील अन्य सदस्यांना मी माझ्या पगारातून काहीच देऊ शकत नव्हतो', असा दावाही तरूणाने आपल्या याचिकेत केला आहे.