मध्य प्रदेश : मध्यप्रदेशमधून कौटूबिक हिंसाचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी विरोधात तक्रार दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिल्याने पती जे केलं त्यामुळे अख्ख पोलिस प्रशासन हादरलं आहे.  त्यामुळे पतीच्या या कृत्यावर पोलीस चांगलेच वैतागले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशच्या खंडवा येथील सूरजकुंडचे रहिवासी अरुण मिश्रा आणि त्यांच्या पत्नीमध्ये घरगुती वाद सुरू होता. त्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्यात पत्नीने पतीविरोधात हुंडाबळीसाठी छळ आणि घरगुती हिंसाचार अंतर्गत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी पती-पत्नीला जबाबासाठी बोलावले होते. जबाबानंतर पतीने देखील पत्नीविरोधात तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र पोलिसांनी नकार दिल्याने संतप्त झालेल्या पती थेट टॉवरवरच चढला.  


पती अरुण मिश्रा यानेही पत्नीविरुद्ध घरातील साहित्य चोरणे आणि अन्य व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याची तक्रार केली होती. अर्जावरून पोलिसांनी पती-पत्नी दोघांनाही जबाब नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते, मात्र पती अरुण मिश्रा पत्नीविरुद्ध चोरीचा एफआयआर दाखल करण्यास ठाम होता. पोलिसांनी चोरीच्या मालाचे बिल मागितले असता तो पोलिसांवर संतापला. 


म्हणून त्याने असं कृत्य केलं
संतापलेले अरुण मिश्रा कोतवाली पोलीस ठाण्यात बांधलेल्या मोबाईल टॉवरवर चढले. पोलिस पत्नीविरोधात तक्रार दाखल करून घेत नसल्याने पतीने असं कृत केल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे तो टॉवरवर चढला होता. या घटनेने पोलिसांमध्ये एकच खळबळ माजली होती. दरम्यान  वकील आणि पोलिसांची समजूत काढल्यानंतर पती टॉवरवरून सुखरूप खाली उतरला. यानंतर पोलिसांच्या जीवात जीव आला.