मुंबई : लग्नानंतर नवऱ्याचं घर हेच बायकोसाठी सगळं काही असतं. आपल्यावर प्रेम करणारा नवरा मिळावा इतकीच एका बायकोची इच्छा असते. परंतु जर अशातच नवऱ्यानं आपल्या बायकोचा विश्वासघात केला, तर एका बायकोनं काय करावं? असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडला. जेथे एक नवरा आपल्या बायकोला सोडून दुसऱ्याच एका महिलेसोबत फरार झाला. ज्यानंतर लोकांनी बायकोच्या खोली जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे संपूर्ण प्रकरण शहर कोतवाली परिसरात असलेल्या गायत्रीपुरम मखदुमपूरचे आहे, बाराबंकी येथील संतोष यादवचा विवाह अंबिका प्रसाद यांची मुलगी शीलम यादव हिच्याशी 18 वर्षांपूर्वी झाला होता.


संतोषच्या घराच्या खालच्या भागात अनेक भाडेकरू राहतात, त्यामुळेच संतोष आमि त्याच्या कुटूंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. ज्यामुळे संतोष आणि शिलम घराच्या वरच्या भागात राहात होते.


लग्नाच्या अनेक वर्षनंतर शिलमला मुल होत नसल्यामुळे सुमारे दीड वर्षापूर्वी संतोषने लक्ष्मणपुरी कॉलनीतील महिलेशी लग्न केलं होतं. घरापासून काही पावलांच्या अंतरावर त्यांनी दुसऱ्या पत्नीला भाड्याची खोली दिली होती. परंतु दुसऱ्या लग्नाच्या आदल्या दिवशी संतोषणे शीलमला मारहाण केली.


त्याचबरोबर लग्नानंतर संतोष आणि त्याची दुसरी पत्नी दोघेही शालीमला हत्या करून फरार झाले होते. त्यामुळे जेव्हा लोकांनी शालीमला खोलीत पाहिलं तेव्हा ते थक्कं झाले


खरंतर त्यादिवशी जेव्हा शीलमचा लहान भाऊ विकास आणि बहीण काजल हे भाच्या ऋतिकचे औषध घेण्यासाठी शहरात आले होते. संतोषचा फोन बंद असल्याचे लक्षात येताच ते त्याला भेटण्यासाठी शीलमच्या घरी पोहोचले. घरी पोहोचलो तर दरवाजा बाहेरून बंद होता.


ते दरवाजा उघडून दोघेही आत गेले असता बेडरूमच्या शेजारी असलेल्या खोलीत बहिण शीलम हिचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. तिच्या नाकातून रक्त येत होते. हे पाहताच त्यांच्या पायाखालची जमीव सरकली


कुटुंबीयांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचूल त्या महिलेच्या खोलीची तपासणी केली. या खोलीचे वर्णन करताना पोलिसांनी सांगितले की, बेडरुममध्ये पडलेली चादर विस्कटली होती आणि केस विसकटलेले होते, तसेच मंगळसूत्र आणि क्लेंचर तुटले होते. तिच्या अंगावर साडी नव्हती. तिच्या हातावर आणि पायावर ओरखडे होते, ज्यावरून स्पष्टपणे दिसून येते की तिने मृत्यूपूर्वी आपला जीव वाचवण्यासाठी पतीसोबत खूप संघर्ष केला होता.