मुंबई : पती-पत्नीमध्ये भांडण होण हे साहजिक आहे. मात्र जर ही भांडणे टोकाला जात असतील तर ती नात्यासाठी फारचं घातक आहेत. मात्र य़ा घटनेतलं भांडण खूपचं टोकाला गेलं आणि आता संपुर्ण कुटूंब उद्ध्वस्त झालं आहे. पतीला मुलं नको होत, यासाठी तो पत्नीला गर्भपात करण्यास सांगत होता. मात्र पत्नीचा त्याच्या या निर्णयाला विरोध होता. पत्नी सतत विरोध करत असल्याने संतापून पतीने टोकाचे पाऊल उचलले आणि जे केले त्या घटनेने संपुर्ण कुटूंब हादरलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

21 वर्षीय हाना मोहम्मद ही पाच महिन्यांची गर्भवती होती. हानाचं तिच्या पतीसोबत जन्मणाऱ्या मुलावरून नेहमी वाद होत होते. खरं तर या घटनेत हानाच्या पतीला मुलं नको होत. यासाठी सतत तो हानाला गर्भपात करण्यास सांगत होता. मात्र हाना मुलाला जन्म देण्यावर ठाम होती. यावरून नेहमी त्यांच्या घरात वाद होत होते.  


पत्नी हानाच्या या सततच्या नकाराला कंटाळून पतीने टोकाचे पाऊल उचलले. पतीने थेट आपल्याच पाच महिन्याच्या गर्भवती महिलेला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पतीने पोबारा केला. तर महिला जळत असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तिला रूग्णालयात दाखल केले.  


डॉक्टरांनी दिली दु:खद वार्ता 
रूग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत महिला 100 टक्के भाजली आहे. तिचा गर्भ मृत झाला आहे आणि आता तिला काढण्यासाठी ऑपरेशन करावे लागेल. तसेच महिला वाचण्याची शक्यताही खूप कमी असल्याचे तिने सांगितले आहे. 


दरम्यान घटनास्थळावरून पतीने पळ काढला होता. या पतीला पकडण्यात पोलिसांना य़श आले आहे. मुलाच्या जन्मामुळे कुटुंबावर आर्थिक बोजा पडणार असल्याची चिंता पतीला होती. त्यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला.