Jyoti Maurya SDM: ज्योती मौर्य (Jyoti Maurya) प्रकरण सध्या चर्चेत आहे. उत्तर प्रदेशची एसडीएम असलेल्या ज्योती मौर्यवर तिच्याच पतीने गंभीर आरोप केले आहेत. नवऱ्याचे स्वखर्चाने ज्योतीला शिकवले मात्र अधिकारी होताच तिने त्याला फसवले, असा आरोप तिचा पती अलोक मौर्यने (Alok Maurya) केला आहे. तर, ज्योतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचंही अलोकने म्हटलं आहे. मात्र, या प्रकरणाचा धसका घेत एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे शिक्षण थांबवले आहे. पतीने अचानक शिक्षण घेण्यास थांबवल्यामुळं नाराज झालेल्या पत्नीने पोलिस ठाणे गाठले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या बक्सर जिल्ह्यात ही अजब घटना समोर आली आहे. चौगाई गावातील महिला पतीच्या मदतीने प्रयागराजमध्ये बीपीएससीची तयारी करत होती. मात्र, पतीने अचानक तिला शिक्षण थांबवण्यास सांगितले व पुन्हा घरी बोलवले. मात्र, महिलेने शिक्षण थांबवण्यास नकार दिला. मला बीपीएससीची परीक्षा देण्याची इच्छा असल्याचं तिने म्हटलं. मात्र. पतीने नकार देत तिला घरी बोलवलं आहे. या घटनेने नाराज झालेल्या तिने तडक पोलिस स्टेशन गाठले व पोलिसांना याची कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या पतीला बोलवून दोघांमधला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. 


खुशबू असं महिलेचं नाव असून पिंटू कुमार तिच्या पतीचे नाव आहे. पिंटू कुमारचे एका खासगी पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. पिंटूच्या त्याच्या पत्नीला अधिकारी बनवायचे होते. म्हणून गेल्या काही वर्षांपासून त्याची पत्नी प्रयागराज येथील कोचिंग सेंटरमध्ये बीपीएससीचे शिक्षण घेत होती. मात्र, ज्योति मौर्या आणि अलोक मौर्या प्रकरण समोर येताच त्याने खुशबूला अभ्यास थांबवून घरी परतण्यास सांगितले.


खुशबूने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पतीला भीती आहे की अधिकारी झाल्यानंतर मीसुद्धा ज्योती मौर्याप्रमाणे फसवणूक करेल. म्हणून त्यांनी माझ्या शिक्षणावर पैसे खर्च करण्यास नकार दिला आहे. पण प्रत्येकजण ज्योति मौर्यासारखं नाही वागू शकत, असं तिने म्हटलं आहे. 


'ज्योति मौर्यच्या प्रकरणामुळं मी अस्वस्थ'


ज्योति मौर्यच्या प्रकरणामुळं मी खूप अस्वस्थ आहे. माझ्या पत्नीच्या अभ्यासासाठी मी आजपर्यंत पूर्ण सहकार्य केले. तिला प्रयागराज येथे पाठवले. मात्र आता मी माझ्या पत्नीला पुढे शिकवू शकत नाही. तिला जर शिकायचं असेल तर ती शिकेल. मात्र मी पैसे देऊ शकत नाही, असं पिंटू सिंहने म्हटलं आहे. 


ज्योती मौर्य केसनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 135 जणींना नवऱ्यांनी शिकवणं बंद केलं?; सत्य काय


काय आहे ज्योती मौर्य प्रकरण


2010साली ज्योतीचे लग्न अलोक यांच्यासोबत झाले होते. लग्नानंतर पुढील शिक्षण सुरू ठेवण्याची तिची इच्छा होती. आलोकने ज्योतीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या कमाईतून ज्योतीला शिकवलं. एका चांगल्या कोचिंग सेंटरमध्येही तिचे अॅडमिशन केले. पण अधिकारी होताच ज्योतीने सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप केला. तसंच, मनीष दुबे नावाच्या व्यक्तीसोबत तिचे अनैतिक संबंध असल्याचा आरोपही अलोकने केला आहे.