Bride Ran Away From Theatre: राजस्थानमधील जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीकर येथील एका तरुणाचे ७ दिवसांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर तो नवविवाहित वधूला आदिपुरुष चित्रपट पाहण्यासाठी जयपूरमधील एका मॉलमध्ये घेऊन गेला. त्यानंतर मध्यंतरात तो थोडावेळासाठी बाहेर आला. परत आल्यावर पाहतो तर नवरी पळून गेली होती. याप्रकरणी तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुण सीकरचा रहिवासी असून त्याचे १५ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नानंतर ते हनिमूनसाठी जयपूरला आले होते. येथे ते दोघे हॉटेलमध्ये थांबले होते, अशी माहिती तरुणाने पोलिसांना दिली. 3 जुलै रोजी त्यांनी चित्रपट पाहण्याचा प्लॅन केला आणि दुपारी 12 वाजता पिंक स्क्वेअर मॉल, जयपूर येथे आदिपुरुष चित्रपटाचा शो बुक केला. इंटरव्हल झाल्यावर दोघेही आनंदाने चित्रपट पाहत होते, असे त्याने सांगितले. मी बाहेरून खाण्यापिण्यासाठी काहीतरी आणतो, तू सीटवर बसून राहा. खायला विकत घेऊन पती सीटवर परतला तेव्हा त्याची पत्नी गायब होती, अशी माहिती त्याने पुढे दिली.


पतीला सुरुवातील वाटले की पत्नी वॉशरूमला गेली असेल. म्हणून तो थोडावेळ वाट पाहत राहिला. पण जेव्हा चित्रपट सुरू झाला आणि तरीही पत्नी परत आली नव्हती. आता मात्र तो अस्वस्थ झाला. यानंतर थिएटरमधून बाहेर आल्यानंतर त्यांने पत्नीचा खूप शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. फोन केला असता तिचा मोबाईलही बंद होता. असहाय पतीने जवळचे पोलीस ठाणे गाठले आणि आदर्श नगर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार कथन केला.


सत्य समजल्यानंतर पतीला बसला धक्का


पोलिसांनी तरुणाच्या तक्रारीवरून हरवल्याची नोंद करून तातडीने कारवाई सुरू केली. पोलिसांनी सीकर आणि शाहपुरा पोलीस ठाण्यांनाही विवाहित महिला बेपत्ता झाल्याची माहिती दिली. शाहपुरा ही त्याच्या पत्नीचे माहेर आहे. पोलीस नववधूचा शोध घेत होते. काही तासांनी शाहपुरा पोलीस ठाण्यातून फोन आला. खोलीत विवाहित महिला बसल्याचे समजले. जेव्हा पोलीस पतीसह शाहपुरा येथे पोहोचले तेव्हा सत्य समजल्यावर त्याला धक्काच बसला.


या लग्नावर मी अजिबात खुश नसल्याचे पत्नीने सांगितले. त्यामुळे पती अन्न घेण्यासाठी बाहेर गेल्यावर आपण पळून गेल्याचे तिने सांगितले. ती बस स्टँडवरून बस पकडून तिच्या माहेरच्या घरी आली. तिला तिच्या पतीसोबत राहायचे नाही, असे विवाहित महिलेचे म्हणणे आहे.  यानंतर पोलिसांनी दोघांनाही घरी पाठवले.