मुंबई : भूक भागवण्यासाठी झोमॅटोवरून ऑर्डर करतो. ही ऑर्डर वेळेत आणि गरमागरम यावी अशी प्रत्येकाची इच्छा. मात्र अनेकदा ट्राफिक किंवा वेगळ्या कारणांमुळे ती उशिरा येते.. हा आतापर्यंतचा आपल्या साऱ्यांचा अनुभव. पण तुम्ही ऑर्डर करावी आणि अवघ्या 20 मिनिटांत तुम्हाला गरमागरम ऑर्डर मिळावी. (Hyderabadis raise funds to buy bike for Zomato delivery person who used a bicycle) याहून सुख ते काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा एक अनुभव हैदराबादच्या व्यक्तीला आला. 9 किमीचा प्रवास सायकलवरून करून एका Zomato Delivery Boy अवघ्या 20 मिनिटांत ऑर्डर पूर्ण केली. त्या व्यक्तीला या डिलिव्हरी बॉयचं खूप कौतुक वाटलं. पण ही व्यक्ती फक्त तोंड कौतुक करून थांबली नाही. 



या व्यक्तीने Zomato Delivery Boy फंड गोळा करायला सुरूवात केली. या व्यक्तीने फंडरेझर तयार करून पैसे उभारून त्या Zomato Delivery Boy ला चक्क बाइक (Bike) खरेदी केली. हा संपूर्ण अनुभव एका व्हिडीओ कैद झाला आहे. 



काय आहे यामागची गोष्ट? 


हैदराबादच्या किंग कोटी परिसरात राहणाऱ्या रॉबिन मुकेश (Robin Mukesh) यांनी 14 जूनला रात्री साडेदहाच्या सुमारास झोमॅटोवरून ऑर्डर केली. मोहम्मद अकील अहमद (Mohd. Aqueel Ahmed) नावाच्या डिलिव्हरी बॉयला ती ऑर्डर अलॉट झाली. अवघ्या 20 मिनिटांत ती ऑर्डर पोहोचलीही. ऑर्डर घ्यायला रॉबिन गेले त्या वेळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण मोहम्मदने सायकलवरून 9 किलोमीटरचं अंतर 20 मिनिटांत कापून गरमागरम ऑर्डर पोहोच केली होती. त्यांनी त्याचं कौतुक केलं.


रॉबिन मुकेश "दी ग्रेट हैदराबाद फूड अँड ट्रॅव्हल क्लब' या फेसबूक फूडीज ग्रुपचे अॅक्टिव्ह मेंबर आहेत. त्यांनी मोहम्मदबद्दलची पोस्ट फेसबुकवर शेअर केली. लोकांनी त्यावर खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर रॉबिन यांनी फंडरेझर चालवून पैसे उभे करून मोहम्मदला बाइक मिळवून द्यायचं ठरवलं. 15 जूनला फंडरेझर सुरू केल्यानंतर अवघ्या 10 तासांत 60 हजार रुपये जमा झाले. फंडरेझर थांबवेपर्यंत 73,370 रुपये गोळा झाले.


या पैशांतून त्यांनी 65 हजार रुपये किमतीची टीव्हीएस एक्सएल बाइक (TVS XL Bike) बुक केली आहे. एक-दोन दिवसांत ती बाइक मोहम्मदला देण्यात आली. तसेच हेल्मेट, रेनकोट वगैरे गोष्टीही त्याला देण्यात आल्या. उर्वरित रक्कम त्याच्या कॉलेजच्या फीसाठी दिली गेली, अशी माहिती रॉबिन यांनी दिली.


21 वर्षांचा मोहम्मद इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकतो. गेल्या वर्षभराहून अधिक काळ तो झोमॅटोत काम करतोय. आपल्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आपल्याला काम करावं लागतंय आणि सायकलवरून काम करता करता सवय झाल्यामुळे आपण वेगाने डिलिव्हरी करू शकतो, असं मोहम्मद सांगतो. आपल्यासाठी लोकांनी पैसे उभारून बाइक खरेदी केली आहे, हे कळल्यावर तो भावुक झाला.