भारतात लॉन्च होणार ह्युंदाईची ही कार, पेट्रोल-डिझेल शिवाय चालणार 470 KM
कोरियाच्या ह्युंदाई या वाहन उत्पादक कंपनीने आपली इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च करण्याची तयारी केली आहे.
नवी दिल्ली : कोरियाच्या ह्युंदाई या वाहन उत्पादक कंपनीने आपली इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च करण्याची तयारी केली आहे.
ह्युंदाईची नवी आणि शानदार कार
ह्युंदाई कंपनीने जेनेवा मोटर शोमध्ये ही कार सादर केली आहे. या कारचं नाव Kona इलेक्ट्रिक असं आहे. ही कार ह्युंदाई कंपनीची ग्लोबल पोर्टफोलिओची दुसरी इलेक्ट्रिक कार आहे.
पहिली इलेक्ट्रिक SUV
आपली पहिली इलेक्ट्रिक कार 2019 मध्ये भारतात लॉन्च केली जाणार असल्याची घोषणा ह्युंदाईने केली यापूर्वीच होती. तर, मारुती कंपनीने 2020 मध्ये आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ह्युंदाईची Kona ही कार इंडियन मार्केटमध्ये येणारी पहिली इलेक्ट्रिक SUV असण्याची शक्यता आहे.
अशी आहे ह्युंदाईची योजना
प्रत्येक महिन्याला आपल्या इलेक्ट्रिक SUV च्या 50-60 युनिट्स विकण्याची ह्युंदाईची योजना आहे. ह्युंदाईची इलेक्ट्रिक कार Kona भारतातच कंपनीच्या प्लान्टमध्ये असेंबल केली जाणार आहे.
एका चार्जवर 470 किमी चालणार
ह्युंदाईची Kona ही कार एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 470 किमी चालणार आहे. ही SUV च्या लाँग रेंज बॅटरी वर्जन (134hp वर्जन) च्या रेंजमध्ये आहे. तर, बेसिक वर्जनची रेंज सिंगल चार्ज केल्यावर 300 किमीपर्यंतची आहे.
ही इलेक्ट्रिक SUV कार 7.6 सेकंदांत 0 ते 100 किमीपर्यंतचा स्पीड पकडणार आहे. नवी Kona इलेक्ट्रिक, रेगुलर कोना सारखीच दिसते. कारची इलेक्ट्रिक मोटर 134hp ची पावर आणि 395Nm चं टॉर्क जनरेट करते.
कारची किंमत?
या कारची किंमत 25 लाख रुपयांच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारचा टॉप स्पीड 155 किलोमीटर प्रति तास असणार आहे. कोना इलेक्ट्रिक SUVचं लिथियम ऑयन बॅटरी पॅक 100KW फास्ट चार्जरने 54 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते.