`मी रेल्वेची कर्मचारी, सीटवरुन उठणार नाही`, पुरुषासाठी आरक्षित सीट सोडण्यास महिलेचा नकार, VIDEO व्हायरल
Viral Video : इंटरनेटवर रेल्वे, लोकलमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण हा धक्कादायक व्हिडीओ नेटकऱ्यांची झोप उडवत आहे. मी रेल्वेची कर्मचारी सांगून एक महिला विनातिकीट आरक्षित सीटवर कब्जा करुन बसली होती.
Viral Video : सोशल मीडियावर क्षणाक्षणाला व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोकल ट्रेनमधील व्हिडीओ असो किंवा लांब पल्ल्याच्या गाडीतील व्हिडीओ असतो. सध्या उन्हाळाचे दिवस आहेत. मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्या असल्याने पालक त्यांना घेऊन गावी जातात किंवा फिरायला जातात. त्यामुळे रेल्वे ट्रेनचे तिकीट फूल झालेली पाहिला मिळतात. अशात अनेक प्रवासी विनातिकीट रेल्वेतून प्रवास करतात. (I am a railway employee I will not get up from the seat ticketless indian woman video viral trending now)
तिकीट नसतानाही ही लोक स्लीपिंग कोच असो किंवा एसी कोच असो हे प्रवासी मुजोरी करुन प्रवाशांसोबत हुज्जत घालत प्रवास करतात. अशीच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक महिला रेल्वेची कर्मचारी असल्याचा दावा करत आरक्षित सीटवर विनातिकीट ठाण मांडून बसली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील ShoneeKapoor या अकाऊंटवर या महिलेचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. या व्हिडीओला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ज्या सीटवर ही महिला बसली आहे. त्या सीटचं तिकीट दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे. त्यामुळे त्याने त्या महिला तिकीट दाखवायला सांगितल्यावर त्या महिने प्रवाशांसोबत वाद घालायला सुरु केली.
ही सीट माझी असून तुम्ही काही करा मी इथून उठणार नाही. त्या व्यक्तीने आपण व्हिडीओ काढत असल्याचही सांगितलं तरी त्या महिला फरक पडत नव्हता. त्या महिलेने तुम्ही टीटीईला फोन करा तरीही मी इथून हलणार नाही. माझी तिकीट मी टीटीईला दाखवेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. डब्ब्यातील इतर प्रवाशीही तिच्याशी वाद घालताना दिसत आहे.
एक महिला म्हणाली तुमच्यासारखा महिलांमुळे इतर महिला बदनाम होतात. तरीही ती म्हणाली तुम्ही बोला काय बोलायचं मी या कानाने ऐकणार त्या कानाने सोडून देणार.
या प्रकारच्या घटना रेल्वेमध्ये सर्रास होतात. काही घटनांचे व्हिडीओ बनतात. तर काही वादातून सुटतात किंवा वाद टोकाला जातो. रेल्वे प्रवास करताना असा अनुभव अनेकांना कधी ना कधी आलेला असतो.