शनिवारी तेलंगणामध्ये (telangana) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधानांनी त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे आरोप केले. राज्याला अशा सरकारची गरज आहे जे कुटुंबाला नव्हे तर जनतेला प्राधान्य देईल, असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला आहे. बेगमपेट (begumpet) येथील रामागुंडम येथे रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड (आरएफसीएल) प्लांटचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या उर्जेचे (energy) गूढ सांगितले आहे. "बरेच लोक मला विचारतात की एवढी मेहनत करूनही तुम्ही थकत का नाही. तेव्ही मी सांगतो की, मी खचून जात नाही कारण मी रोज 2-4 किलो शिव्या (Curse) खातो. देवाने मला असा आशीर्वाद दिला की याचे (शिव्या)  पोषणात रुपांतर होते," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.



यावेळी बोलताना माझ्याच्याकडे खूप ऊर्जा आहे, कारण मी खूप शिव्या खातो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. "निराशा, भीती आणि अंधश्रद्धेपोटी ते मला सकाळ संध्याकाळ शिव्या देतात. पाणी प्यायल्यानंतर शिवीगाळ करतात. यातच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले आहे, त्याच्याकडे शिव्या देण्याशिवाय काही उरले नाही. काळजी करू नका. गेल्या 20-22 वर्षांपासून माझ्यावर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अत्याचार होत आहे. अजिबात काळजी करू नका," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.


"तेलंगणाच्या नावावर जे लोक पुढे आले, मोठे झाले, सत्तेवर आले त्यांनी राज्याला मागे ढकलले, हे खेदजनक आहे. तेलंगणातील सरकार आणि नेत्यांनी नेहमीच राज्याच्या क्षमतेवर आणि तेथील लोकांच्या प्रतिभेवर अन्याय केला. ज्या राजकीय पक्षावर तेलंगणातील जनतेने सर्वाधिक विश्वास ठेवला, त्या पक्षाने तेलंगणाचा सर्वाधिक विश्वासघात केला. अंधार पडल्यावर कमळ फुलायला सुरुवात होते. सूर्योदय होण्यापूर्वीच तेलंगणात कमळ फुललेले पाहायला मिळते," असे पंतप्रधान म्हणाले.