शॉर्ट कपडे वापरण्याचे कारण सांगताना राधे मां रडली ढसाढसा
राधे मां आणि वादविवाद हे तसे नवे नाहीत. बऱ्याचदा आपल्या वादांमुळेच राधे मां चर्चेत येते. सध्याही राधे मां अशीच चर्चेत आली आहे. एका खासगी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत राधे मांने आपल्या खासगी आयुष्याबाबत प्रश्नांची उत्तरे दिली. या वेळी महिला पत्रकाराने मिनी स्कर्ट बाबत प्रश्न विचारला असता राधे मां ला रडू आवरणे कठीण झाले.
मुंबई : राधे मां आणि वादविवाद हे तसे नवे नाहीत. बऱ्याचदा आपल्या वादांमुळेच राधे मां चर्चेत येते. सध्याही राधे मां अशीच चर्चेत आली आहे. एका खासगी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत राधे मांने आपल्या खासगी आयुष्याबाबत प्रश्नांची उत्तरे दिली. या वेळी महिला पत्रकाराने मिनी स्कर्ट बाबत प्रश्न विचारला असता राधे मां ला रडू आवरणे कठीण झाले.
राधे मां ने इंडिया टीव्हीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत राधे मांने आपल्या आयुष्यातील अनेक घटनांना थेट उत्तरे दिली. पत्रकाराने राधे मां ला मिनी स्कर्ट आणि शॉर्ट कपडे वापरण्याबाबत प्रश्न विचारला असता राधे मां ला रडू आवरणे कठीण झाले. राधे मां थेट कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडू लागली. आखाडा परिषेने जाहीर केलेल्या ढोंगी बाबांच्या यादीत समावेश केल्याबद्धल तसेच, व्यवसाय, चोरी करणे अशा आरोपांवरही राधेमांने थेट भाष्य केले. राधे मांने म्हटले आहे की, ' मी बिनधास्त आहे. जगाला वाटते म्हणून मी माझी जीवनशैली बदलू शकत नाही.'
पुढे बोलताना राधे मांने म्हटले आहे की, माझे वयाच्या १७व्या वर्षीच लग्न झाले. लग्नानंतर चारच वर्षांत माझे पती मला आणि दोन मुलांना सोडून विदेशात गेल. अशा वेळी मी चुकीच्या रस्त्याने जाण्यापेक्षा ईश्वराला शरण गेले. मुलाखतीदरम्यान राधे मांने सांगितले, मी छोटे कपडे वापरते. पण, केवळ आपल्या बेडरूममध्ये. मी बेडरूमबाहेर कधीच शॉर्ट कपडे वापरले नाहीत.
राधे माने उलट पत्रकारालाच विचारले तुम्ही नाही का वापरत तुमच्या बेडरूममध्ये शॉर्ट कपडे? मी छोटे कपडे वापरते कारण मला पूर्ण कपड्यात झोपच नाही येत.